पान:केकावलि.djvu/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४२ मोरोपंतकृत महारसिक तंद्रसी, विटति ऐकतां येरै ते; ह्मणण्यांत रूपकालंकार झाला. भावार्थ:-भगवंताची कथा शुकाचार्यासारख्या खऱ्या भगवद्भक्ताच्या ऐकण्यांत पुनः पुन्हा जरी आली तरी त्यांना तिचा कंटाळा न वाटतां उलट ते तिच्या प्रेमरसाने मोहितच होतात. अरसिक लोक मात्र भगवंताची कथा फिरून फिरून ऐकून कंटाळतात. २. आली. व्या०:-'घे, ने, ये, हो, इत्यादि एकारांत व ओकारांत धातूंची कर्तरि विध्यर्थी द्वितीय पुरुषी एकवचनी रूपें कवितेत कधी कधी स्वार्थी तृतीय पुरुषी एकवचनी वर्तमानकाळी व कधी कधी भूतकाळी योजितात.' [पद्यरत्नावली-पृ. ९०.] येथे त्याचा भूतकाळी प्रयोग आहे. ३. रत होतो; रमतो. व्या०:-'गद्यात्मक ग्रंथांत ज्या काळी जो प्रयोग मुळीच होत नाही किंवा क्वचित् आढळतो, तो कवितेत पुष्कळ वेळां आढळतो. करी, टाकी, बसे, खेळे, मळे, रमे इत्यादि ज्या रूपांचा गद्यात्मक ग्रंथांत रीतिभूतकाळी प्रयोग होतो, त्या रूपांचा कवितेत प्रायः वर्तमानकाळी व पुष्कळदां शुद्ध भूतकाळी प्रयोग करितात.' [पद्यरत्नावली-पृ० ८७.] वरील केकेंत 'रते' ह्याचा उपयोग वर्तमानकाळी केला आहे. १. मोठा रसज्ञ, परमार्थजिज्ञासु; (अर्थातरी) शृंगारहास्यादिरसज्ञ. २. त्या भगवकथारूपी नटीच्या नृत्यगायनादि रसांत; येथे 'रस' शब्द श्लिष्ट आहे. कथापक्षी रस ह्मणजे शंगारादि नवरस, किंवा मुख्यत्वेकरून भक्तिरस; नटीपक्षीं शृंगारहास्यादि कामीजनांस उचित असे रस. शृंगाररसः-रसांची नांवे व त्यांविषयी इतर माहिती मागील एका टीपेंत (पृ० १४९-१५०) दिली आहे. या केकेंत शृंगाररसाचे खमंग वर्णन आहे. परस्परांचे ठिकाणी- अनुरक्त अशा तरुण स्त्रीपुरुषांमध्ये दर्शनस्पर्शनालिंगनादिकांनी उत्पन्न होणारी जी कामविषयव) रति (आनंद) तिला शृंगार ह्मणतात. ह्या रसाचे मुख्य दोन भेद आहेत. १ संभोगशंगार, २ विप्रलंभशंगार. जेथे काव्यांत परस्परांस अनुकूल अशा विलासी स्त्रीपुरुषांच्या परस्परदर्शनस्पर्शनचुंबनालिंगनादि हर्षभरित क्रियांचे वर्णन असतें तो संभोगशंगार होय. जेथें स्त्रीपुरुषांमधील प्रीति अतिशय वाढते परंतु इच्छित मनोरथ पूर्ण होत नाहीत तेथें विप्रलंभशंगार होतो. 'अनुकूलौ निषेवेते यत्रान्योन्यं विलासिनौ । दर्शनस्पर्शनादीनि स संभोगो मुदान्वितः ॥ भावो यदा रति म प्रकर्षमधिगच्छति । नाधिगच्छति चाभीष्टं विप्रलंभस्तदोच्यते ॥' (काव्यप्रदीप पृ० ८८) भंगाररसात स्थायीभाव (प्रधान मनोविकार) रति' (स्त्रीपुरुषांची परस्परप्रीति) असतो. पुरुषास स्त्रीविषयीं रति उत्पन्न झाली तर 'आलंबनविभाव' (ज्याला धरून रसोत्पत्ति होते ते कारण) स्त्री, स्त्रीस पुरुषाविषयीं रति उत्पन्न झाली तर 'आलंबनविभाव' पुरुष असतो. एकांत स्थल, सुंदर बाग, रमणीय गृह, वनविहार, वसंत व वर्षाऋतु, पुष्पसुगंध, सुरस गायन, चंद्रोदय, शृंगारिक ग्रंथांचे वाचन हे स्त्रीपुरुषांचे ठिकाणी प्रेमोत्पत्ति करितात; यास्तव हे उभयनिष्ठ सामान्य उद्दीपनविभाव होत. पुरुषास स्त्रीचे सौंदर्य, तिचे नेत्रकटाक्ष, तिचे अलंकार व तिचे हावभाव हे उद्दीपनविभाव असून स्त्रीस पुरुषाचे सुंदर रूप, त्याचे विद्याधैर्यशौर्यादि गुण, त्याचा सुंदर पोषाक हे उद्दीपनविभाव होत. वरील विभावांनी रति (प्रेम) वृद्धिंगत झाली ह्मणजे तो पुरुष किंवा ती स्त्री ह्यांचे मुख प्रसन्न होतें, नेत्र विकास पावतात, ते एकमेकांशी गोड भाषणे करून एकमेकांस चुंबन किंवा तात, स्मितहास्य करितात व विनोद करितात. ह्या क्रियांस अनुभाव (कार्यरूप शरीर