________________
केकावलि. २२१ प्रसिद्ध तुमचे महासदय पाय; जीवांकडे चुकी, ह्मणुनि होतिल क्षणहि काय जी! वांकडे ? । न निष्ठुर पिता; ह्मणे मनिं 'न हो प्रजा टोणेपी;' ५ श्लो० २०,२२). वरील विवेचनावरून निदान कालिदासाच्या रघुवंशनामक काव्याशी तरी पंतांचा उत्तम परिचय होता तसेंच हनुमन्नाटकाशी त्यांची चांगली ओळख होती ह्या गोष्टी चाणाक्ष वाचकांस कळून येतील. या केकेच्या द्वितीयार्धाशी समानार्थक अशीं सुभाषितें खाली दिली आहेतः-(१) 'तप्तहि सन्मन धरितें पुनरपि वरितें महापय शमातें.' । [आदिपर्व-अ० ३६ गी० २५], (२) 'कुळजाच्या हृदया पळ कोप असावा नृपा! पया उतसा.' । [हरिवंश-अ० १२ गी० ६६] (३) 'तापे बहुत परि निवे सुज्ञाचे हृदय ते जसें तोय.' । (ब्रह्मो. ८,१७) (४) आमरणांताः प्रणयाः कोपास्तत् क्षणभंगुराः । परित्यागाश्च निःसंगाः भवंति हि महात्मनाम् ॥ [हितोपदेश]. ७. थंडपणा, शीतळता. भावार्थ:-देवानें कोणाला मारले किंवा बांधलें म्हणून त्याच्या हृदयांतील साहजिक दया अणुमात्र उणी होत नाही. १. प्रास्ताविकः-देवाची सदयता कधीही नाहींशी व्हावयाची नाही, असा अभिनाय कथित होत्साते कवि देवाला आळवितात. अन्वयार्थः-तुमचे (भगवंताचे) पाय (चरण) महासदय (अत्यंत कृपाळू) [हें] प्रसिद्ध (सुप्रसिद्ध, सर्वांस माहित आहे), [ते तुमचे पाय] जीवांकडे (आम्हासारख्या प्राण्यांकडे) चुकी (दोष, अपराध) म्हणुनि (म्हणून) क्षणहि (क्षणभर तरी) वांकडे (प्रतिकूळ, अहितकारक) होतील काय जी! ? पिता (बाप) न निष्ठुर (कठोर, मुलाचें अहित करणारा नसतो), प्रजा (संतति) टोणपी (मूर्ख, अडाणी) न हो (होऊ नये) [असें मनिं (मनांत) म्हणे (म्हणतो); अपथ्यरुचि (अपथ्य म्हणजे खावयाचे नाहीत अशा प्रकारच्या पदार्थांची आवड ज्याला आहे असा) कोण (कोणता) रुग्ण (रोगी) कटुक ओखदें (कडु औषधे) पी (पितो)? प्रथमार्धाचा अर्थः-प्रभो! तुमचे चरण सर्व जीवांविषयी अत्यंत कळकळ बाळगतात ही गोष्ट सर्वांस विदित आहे. आम्हां मनुष्यांकडून अपराध घडले म्हणून तुमचे चरण जीवांचे कल्याण करण्यास क्षणभर तरी प्रतिकूल होतील काय? अर्थात् होणार नाहीत असे उत्तर. आम्हां जीवांकडून कितीही अपराध घडले तरी तम्ही सदयबुद्धीने त्यांची क्षमाच करावी. २. प्राण्यांकडे. ३. विरुद्ध, प्रतिकूळ. ४. जनक. बाप. तृतीयचरणार्थः-['आम्हांकडून कांहीं अपराध घडले तरी त्यांची क्षमा करणेच तुम्हांला युक्त आहे' याला कवि दृष्टांत देतात.] मुलाकडून केवढीही चूक झाली तरी बाप मुलाच्या कल्याणाविषयीं कधीही निष्ठुर होणार नाही. त्याच्या मनांत नेहमी हेच वागत असते की आपली मुले मूर्ख निपजूं नयेत, व त्याकरितांच तो मुलांस रागें भरतो व शासन करितो. म्हणून तो निर्दय असें म्हणता येत नाही. तसेंच जीव चुकतात, स्वच्छंदाने वागतात म्हणून तुम्ही त्यांना शासन करितां एवढ्यावरून तुम्ही त्यांच्या विषयी निर्दय झाला असे म्हणणे चुकीचे होईल. ५. मूर्ख, अक्षरशत्र, पारमार्थिकज्ञानशून्य.