पान:केकावलि.djvu/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २०९ तपोऽनलिं, तसे मुनि त्यजुनि; जोडिलीं माकडे; । समागम (सहवास, दर्शन भेट) घडो (घडावा) म्हणून [जे मुनि तपोनली (तपरूपी अग्नीत) लांकडे जाहले (तपश्चर्या करून ज्यांनी आपले देह शुष्क काष्ठवत् केले), तसे मुनि (तशा प्रकारचे दारुण तप करणारे ऋषी) त्यजुनि (सोडून) माकडे (वानरें) जोडिलीं (मिळविली); ज्या जनास्तव (ज्या प्रियजनाकरितां) बहु अयुक्त (पुष्कळ अयोग्य गोष्ट) घडे (घडली) सांकडे (संकट) पडे (पडलें), तदुक्तिहुनि (त्या जनाच्या भाषणाहून) आमुचें (आमचे) बोलणे (भाषण मागील केकेंत 'सीतेसाठी तुम्हांला इतके कष्ट भोगावे लागले असून तुम्ही तिच्याविषयी सदय होतां मग मजविषयींच इतके अकृप कां?' ह्या अर्थाचें कवीचे भाषण) बहुत (पुष्कळ) वांकडे (विरुद्ध, वाईट वाटण्याजोगें) [काय ? प्रथमार्धाचा अर्थः-देवा? ज्यांनी तुझें दर्शन व्हावे म्हणून दारुण तप करून आपले देह काष्ठासारखे शुष्क व रोड करून घेतले, अशा महान् तपस्व्यांस सोडून तुम्ही रामावतारी आपल्या भोंवतीं माकडे गोळा केली. वास्तविक तुम्ही आपल्या दर्शनाकरितां उत्सुक झालेल्या ऋषींच्या समागमांत काळ घालवायाचा. पण ते सोडून तुम्ही आपल्या भोंवतीं माकडे गोळा केली तेव्हां तुम्हांस काय म्हणावें? 'मुनि लांकडे झाले' असे म्हणण्यांत रूपकालंकार झाला. ६. रामदर्शनार्थ दंडकारण्यवासी ऋषिजनांनी आपले देह तीव्र तप करून लांकडासारखे शुष्क केले. यासंबंधी मुक्तामालेतील पुढील श्लोक पहा:-'कुशली तेऽस्ति कुमारो मारोदीरंव बत! बहोः कालात् । तृषिताः पिबंतु वन्याः संन्यासिन उत्सुकाः सुकार्यमिताः॥१६. अर्थः- 'हे कौसल्ये! तुझा कुमार खुशाल आहे; रडू नकोस. चिरकाळपर्यंत जे ऋषि सर्वस्वन्यास करून याच्याकरितां तपश्चरण करून अत्यंत कृश होत्साते मोठ्या औत्सुक्याने याच्या मार्गाकडे डोळे लावून बसलेले आहेत, ते चातकवत् संतुष्ट होवोत.' (नि. मा.) - १. तप (तपश्चर्या) हेच अनल (अग्नि) त्यांत, तपश्चर्यारूप अग्नीत. रामदर्शनार्थ उत्सुक झालेले मुनि नारायणोपनिषदांत सांगितलेला पुढील प्रकारचा यज्ञ करीत असावेत. म्हणजे त्यांच्या यशांत आत्मा हा यजमान, श्रद्धा ही पत्नी, शरीर हे सरपण, उर वेदी, लोम कुश, वेद हे शिखा, हृदय हे यूप, काम हा तूप, क्रोध पशू, तप हें अग्नि, दम शमयिता, वाक् हीच दक्षिणा इत्यादि सामग्री व मंडळीच असावीत (तस्यैवं विदुषो यज्ञस्यात्मा इ०'). पाठभेदः-ह्या ठिकाणी 'तपोनिधि' (तपश्चर्येची खाण, अत्यंत तपस्वी) असा पाठ 'सर्वसंग्रह'प्रतीत व 'यशोदापांडुरंगी'त आढळतो. २. येथे मुनींचा त्याग आणि माकडांचा स्वीकार आहे म्हणून हा परिवृत्ति अलंकार होय. याच्या स्पष्टीकरणार्थ केका १५ पृ० ४६ टीप २ पहा. याची आणखी उदाहरणे:- (१) 'लागतसें तुझिया पायां । मातें ओपी सुंदर काया । माझी होऊनि वडील जाया। भाग्य भोगी इंद्राचें। (मुक्तेश्वर-विराट०) (२) 'वाजविती वेणु वनीं रात्रौ बळकृष्ण एकदां; त्यांतें । सेविति गोपी अधरामृत पाजूनि तृप्तिदात्यातें' ॥ (मोरोपंत मंत्रभागवत, दशम ४१७.)