________________
१९२ मोरोपंतकृत तुम्हा शिव, शिवा तुम्ही भजतसां; शुक, व्यास हा _संदर्थ वदले; पुरातन कथा, न नव्या, संहा. ॥ तुझाचि अवतार तो सुत पराशराचा; वळे, ७२ . एकरूपच वाटतां. २. तोंडपुजा. तोंडासारखें गोड बोलणारा. 'ब्राह्मणांची, विशेषतः भटांची याचकवृत्ति असते तेव्हां त्यांपैकी पुष्कळ तोंडासारखे गोड बोलणारे असतात यावर तर पंतांचा कटाक्ष नसेलना? खात्रीपूर्वक कांहींच सांगवत नाही. 'लुबरा हा शब्द हिंदुस्थानी आहे. 'कनककशिपुपरिस अधिक अससि असें ती ह्मणे तया लुबरी' (हरिवंश ४८.२९९.) . १. भक्ती करितां, पूजितां. तृतीयचरणार्थः-मुरांतक विष्णो! आपणास शिव पूजितो व आपण शिवाची पूजा करितां. हे मीच म्हणतों असें नाहीं तर व्यास व शुकाचार्य यांसारखे तुमचे भक्तही हेच सत्य वर्णन करितात. कथासंदर्भ:--शिव आपणास विष्णुभक्त म्हणवून घेतो व विष्णु आपणास शिवभक्त म्हणवितो. याविषयी केका १ त 'सदाशिवमनोविनोदास्पदा' यावरील टीप वाचावी. 'हरिवंशांत व्यासच्छात्र वैशंपायन जनमेजयास शिवविष्णुसंबंध सांगतांना पुढील उद्गार काढितो:- कोठे ईश्वरता हे कोठे धरितात जीवता राया ! । भजती अन्योन्यातें लीलेने दास जीव ताराया. ॥' [ अध्याय ४९ गी० ६]. २. कथासंदर्भ:शुक हा कृष्णद्वैपायन व्यासास शुकीचे रूप धारण केलेल्या घृताची नामक अप्सरेपासून झालेला पुत्र होय. हा जन्मापासून ब्रह्मनिष्ठ होता. ह्याची गणना परमभागवतोत्तमांत होते. ३. व्यास 1 शब्दाचा अर्थः-वेदविस्तार करणाऱ्यांस व्यास म्हणतात. यांचे काम वेदांची झालेली अव्यवस्था मोडून ते सुव्यवस्थित करावे हे होय. देवी भागवतांत 'प्रत्येक चौकडीच्या द्वापारांत एक एक व्यास । होतो. कृष्णद्वैपायन हा अठ्ठाविसावा व्यास असून याच्या पुढे द्रौणि व्यास होणार' असे सांगितले आहे. (देवीभागवत स्कंध १ अध्याय ४ ) अलीकडे पुराणिकांस व्यास म्हणतात. येथे सत्यवतीसुत (पाराशर व्यास उद्दिष्ट आहे. कथासंदर्भ:-सत्यवतीस कौमार्यावस्थेत पराशर-पीपासून झालेला पुत्र. ह्याने अठरा पुराणे, भारत, भागवत हे ग्रंथ रचिले. ४. खरा अर्थ. ५. जुन्या. पुरातन कथा पुराणे. ६. सहन करा. शिवाला विष्णु व विष्णूला शिव मंटल्याचा राग मानूं नका. चतुर्थचरणार्थ:-शिव व विष्णु हे एकच आहेत, हे एकमेकांची भक्ति कारतात ह्या गोष्टी जुन्या व पुराणांतील आहेत, नवीन नाहींत. ह्मणून माझ्या वर्तनाचा राग मानू नका. ७. प्रास्ताविकः-मागल्या केकेंत हरिहरांत भेद नाही याबद्दल व्यासवचनाचा आधार दिला. यांत कवि व्यासाची प्रशंसा करून भगवन्नाममाहात्म्य वर्णन करण्यास सरसावतात. अन्वयः-तो पराशराचा सुत तुझाचि अवतार; जन तदुक्तिस वळे प्रभो! त्रिभुवनेश्वरा! तोजरि निजेमध्ये चावळे तरि जी जना सुखी करि, ती तव विशुद्ध नामावली मावली [व्यासाच्या मुखीं प्रकट होय. व्यास हा भगवंताचाच अवतार आहे. तेव्हां त्याने सांगितलें तें भगवंतानें तल्याप्रमाणेच आहे. व्यास भगवंताचाच अवतार याविषयी वचनें:-(१) 'अवतरला कराया अनुग्रह व्यास । ज्याच्या भगवान् घेतो पावक होउनि अनुग्र हव्यास. ॥'