________________
ककावाल. मला जरि म्हणाल बा ! तरि विशंक; लुंब्रा म्हणा; । दैत्यांचा नाश केला हे पाहून पुष्कळ वर्षे ब्रह्मदेवाची आराधना करून एक वर मागून घेतला. तो असा की ज्याला ज्याला मी युद्धांत आपल्या करतलाने स्पर्श करीन तो अमर असला तरी मरावा. पुढे ह्याने अमरावतीला जाऊन इंद्राला, व यमपुरीस जाऊन यमाला जिंकिलें. यमाच्या सांगण्यावरून हा क्षीरसागरनिवासी विष्णूस जिंकण्यास गेला. विष्णूने तूं मला जिंकण्यास आलास पण तुझें उर भीतीने धडधडते तेव्हां अशा भित्र्याशी मी युद्ध करित नाही असा याचा धिक्कार केला. तेव्हां याने 'छे! ऊर कोठे धडधडते आहे' असे म्हणून आपल्या हृदयावर जोराने हात मारिला. त्याबरोबर तो जमिनीवर आदळला. अशा रीतीने त्याचा वर त्यालाच वाधला. नंतर विष्णूनें आपलें चक्र सोडून त्याचे शिरकमळ छेदिले. (वामनपुराण अ०६०). ५. ब्राह्मणः-'ब्रह्म' याचा मूळ अर्थ 'स्तोत्र', 'ब्रह्म करणारा' ह्मणजे 'स्तोत्र रचणारा' तो ब्रह्मा असा शब्द वेदांत अनेक ठिकाणी आढळतो. "जो स्तोत्र गातो, जो इंद्रादि देवांचे स्तोत्र रचितो त्यास 'ब्रह्मा' अथवा 'ब्राह्मण' असें ह्मणत. त्यांचा अर्थ आतांप्रमाणे एक जातीचा पुरुष असा होत नसे. जो जो 'ब्रह्म' रची, मग तो कोणत्याही वर्गाचा मनुष्य असो त्यास 'ब्रह्मा' अथवा 'ब्राह्मण' ह्मणत असत. नंतर ब्रह्मकर्त्यांची हळूहळू जात झाली." (वेदार्थयल अंक १५ सूक्त ६२ मंडल १ मंत्र १३ वर टीप). भगवद्गीतेत ब्राह्मणाचे गुण पुढील प्रमाणे सांगितले आहेत;=('शमो दमः' इ०) 'तप क्षमा दम शम शौचास्तिक्य अवक्रता । ज्ञान विज्ञान या झाल्या विप्रवर्णासह क्रिया' ॥ (गीतेवरील वामनी समश्लोकी १८.४२ ) स्मृतिवचन असें आहे-जन्मना जायते शूद्रः संस्काराद्विज उच्यते । वेदाध्ययनतो विप्रो ब्रह्म जानाति ब्राह्मणः' ॥ ब्राह्मण श्रेष्ठ कां? याविषयीं यजुर्वेदाचे वचनः='ब्रह्मजिज्ञानमित्याह तस्यात् ब्राह्मणो मुख्यो मुख्यो भवति य एवं वेद ब्रह्मवादिनो वदंति' । (हिरण्यकेशीशाखासंहिता, पांचवें अष्टक दुसरा अध्याय, सातवा अनुवाक.) १. शंकारहित, खुशाल. अन्वयार्थः-[मी तुझांस] क्षण (एकदां) पुरांतक (त्रिपुरांचा नाश करणारा-शिव)[व] क्षण (एकदां) मुरांतक (मुरदैत्यास मारणाराविष्णु) [असे] ह्मणे (ह्मणतों); [याबद्दल मला ब्राह्मणा (ब्राह्मणाला) बा! (देवा!) जरि [तुझी] लुब्रा (तोंडपुजा) ह्मणाल (ह्मणणार असाल) तरि विशंक (खशात ह्मणा; [पण खरा प्रकार असा आहे की] शिव तुह्मा (विष्णूला) [भजतो नही (विष्णु) शिवा (शंकराला) भजतसां (भजतां) [हे मीच ह्मणतों असें नाहीं तर] हा सदर्थ (खरा अर्थ) शुक व्यास वदले (शुकाचार्य वेदव्यासासारख्या ज्ञात्यांनी अशा प्रकारचे वर्णन पुराणांतून केले आहे); [या] पुरातन कथा (जुन्या गोष्टी. पौराणिक कथा); नव्या (नवीन) न (नाहीत); [ह्मणून सहा (सहन करा, माझें ह्मणणे न रागावतां ऐकून घ्या). प्रथमार्धाचा अर्थः-मी तुम्हांला एक वेळ पुरांतक शंकरा! म्हणून हाक मारितों, लगेच मुरांतक विष्णो! म्हणून आळवितों, यावरून मला जर आपण लुब्रा (तोंडपुजा, तोंडासारखें वरून बोला म्हणत असाल तर विशंक (खुशाल) म्हणा, पण मला तुम्ही वास्तविक दोघेही