पान:केकावलि.djvu/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. उदारपण वानिलें; अजि! गुरूपहासा बँळे कसें करिल लेंकरूं ? निपट हे पहा साबळें.॥ तुह्मां हरिहरांत ज्या दिसतसे, दिसो; 'वास्तव' १. स्तविलें, वर्णिले. देवा! मी वर्मेकम काढून तुमची निंदा केली असे समजून आपण मजवर रागावत असाल, पण मी तसे केले नसून उलट तुमच्या औदार्याची स्तुतिच केली; उदारत्वाची प्रशंसा केली असे स्पष्ट सांगून कवीने आपले उत्कट प्रेम आणि ईश्वरनिंदाभय ही व्यक्त केली आहेत. २. अहो महाराज! ३. गुरु+उपहासा जन्मदाता पिता किंवा इतर वडील माणसे यांच्या उपहासाला म्हणजे निंदेला. ४. बुद्धिपूर्वक, - जाणूनबुजून, मुद्दाम. 'लेकरूं गुरूपहासा बळें कसें करील?'=लहान मूल वडिलांची निंदा जाणूनबुजून कशी बरें करील? करणार नाहीं-हें उत्तर. मी माझ्या मते तर आपली स्तुतिच केली. पण तसे करण्यांत, चुकून आपली निंदा घडली असल्यास मला क्षमा असावीहा कवीचा आशय. ५. केवळ, अगदी निस्तुक, खरोखरच. ६. भोळे, अज्ञान. देवा! मी खरोखरीच भोळेपणाने आपली स्तुति केली, त्यांत आपली निंदा झाली असल्यास ती चुकून झाली असे समजावे. अज्ञान लेकरूं जाणूनबुजून वडिलांची निंदा कदापि करणार नाही, साहजिक बोलण्यांत तसा भास झाला तरी त्याची क्षमा वडिलांनी केली पाहिजे. ७. प्रास्ताविकः-तुमचा प्रसाद प्राप्त व्हावा म्हणून मी तुमची केकास्वराने प्रार्थना करीत असतां, तुमच्या देखत शिवाची निंदा मजकडून कशी बरें होईल? तुम्ही व शिव एकच आहां म्हणून शिवाची निंदा ती तुमची निंदा होणार नाहीं काय? व तुमची निंदा तर माझ्याकडून कदापि होणे नाही. अशा अभिप्रायाने कवि शिवविष्णूंचा अभेद यांत वर्णन करितात. अन्वयः-ज्या (ज्याला) तुम्हां हरिहरांत (विष्णुशंकर या दोघांत) [भेद दिसतसे (दिसतो) [त्या] दिसो; प्रबुद्ध (ज्ञाते, तत्वज्ञ) 'वास्तव (वास्तविक) तिळहि (थोडा देखील) भेद नसे' असें] म्हणती (म्हणतात), यास्तव (म्हणून) मी (मोरोपंत) मनिं (मनांत) म्हणे (म्हणतों) जें शैव (शिवोपासक)स्वमत (आपलें मत, शिव मात्र खरा देव, विष्णु खोटाः किंवा 'शिव थोर विष्णु लहान' असें शैवमत) वर्णिती (वर्णन करितात) ते यथार्थ (ोय आणि खरें) न (नाहीं), [तसेंच वैष्णव (विष्णूपासक) दुराग्रही (अतिशय आग्रही, खोटा आग्रह धरणारे, विष्णु तेवढा खरा देव, शिव खोटा, अथवा 'हरि विशेष हर गौण' असे म्हणणारे म्हणून दुराग्रही) [आहेत]; ही (हरिहरात्मक) दैवतें (देव) परम मुख्य (प्रमुख) [आहेत]. ८. हरि-विष्णु, हर-शंकर, या दोघांत. 'हरि' शब्दाची व्युत्पत्तिः-'हरिवंश' भविष्यपर्व, अ० ८८ श्लो० ४५ यांत पुढीलप्रमाणे दिली आहे. 'हरसि प्राणिनो देव! ततो हरिरिति स्मृतः' । शं करोसि सदा देव ! ततः शंकरतां गतः॥९.ज्याला. तयां ...भेद:-तुम्हां विष्णुशिवांत ज्याला भेद दिसत असेल त्याला तो खुशाल दिसो. पण जे सज्ञ लोक आहेत ते तुम्हां दोघांत तिळमात्रही भेद नाही असे म्हणतात. ज्याला