पान:केकावलि.djvu/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८४ मोरोपंतकृत दिले अमृत पन्नगा, तशि खळी कृपा त्रासदा. ॥ ६९ अतिप्रिय, सुखप्रद, प्रेथम तूं मुंदंभोद या मयूरहृदया; तुझी क्षण विटो न शंभो! दया;। १. दूध. चतुर्थचरणार्थः-सर्पाला दूध जरी पाजले तरी जसा तो आपलें दुष्टत्व टाकीत नाहीं त्याप्रमाणे खळावर (दुष्ट मनुष्यावर) केवढी जरी कृपा केली तरा ती त्रास देणारीच होते. पंतांनी 'नामसुधाचषकां'त, असाच उद्गार काढिला आहे :'दुग्धप्रदासि निर्विष होइल मुख काय काद्रवेयाचे ?' [ नामसुधाचषक-गी० ८६ पृ० ३२०. ] अमक्या मनुष्याने आपल्याला दूध पाजलें म्हणून त्याला आपण चावू नये असा विचार जसा सर्पाच्या डोक्यांत कधी येत नाही त्याप्रमाणे दुष्ट मनुष्यांवर कितीही उपकार केले तरी ते आपल्या जातीवर जाऊन उपकार करणाऱ्यावर शस्त्र उपसण्यास कधी मागे पुढे पाहावयाचे नाहींत. म्हणून दुष्टावर केलेली कृपा त्रास दे. णारी होते, यास्तव तसे कधीं करूं नये. २. सोला. व्यु०:- सर्प पायांनी चालत नसून पोटाने सरपटत जातो म्हणून त्याला पन्नग म्हणतात. [पन्नं पतितं यथा तथा गच्छतीति पन्नगः.] ३. अन्वयः-[ हे मुदंभोद! तूं प्रथम या मयूरहृदया सुखप्रद [आणि] अतिप्रिय [आहेस, शंभो! तुझी दया [या मयूराला] क्षण न विटो; [म्यां] उदारपण वानिलें; अजि! [महाराज!] पहा, हे निपट साबळ लकरू बळें गुरूपहासा कसें करील? प्रास्ताविकः- मागल्या दोन केकांत शिवाच्या सत्पात्री दानाचें एक व असत्पात्री दानाचें एक अशी दोन उदाहरणे दिली आहेत, त्यावरून शिवास राग आला असेल अशी कल्पना करून कवि या केकांत त्याचे समाधान करितात. ४. सुख देणारा. ५. अगोदरच. ६. मुद् (आनंद)+अं. माद (मघ. अभस्-जल, द-देणारा)=आनंदरूप जल देणारा मेघ. प्रथमचरणाचा अन्वयाथः- तूं मुदंभोद (आनंदरूपी जल देणारा मेघ) या मयूरहृदया (मोराच्या अंतःकरणास, पक्षी, मोरोपंतकवीच्या अंतःकरणास) प्रथम (प्रथमपासून, अगोदरच ) अतिप्रिय (अत्यंत प्रियकर) सुखप्रद (सुख देणारा) [आहेस.' मुदोद' हे संबोधन मानले तरी प्रशस्तच. स्वभक्तांस स्वर्गसुखापासून मोक्षापर्यंत सर्व सुखें प्राप्त करून देणाऱ्या आनंदघना शंभो! आपण या मयूराच्या हृदयाला पहिल्यापासूनच सुख देणारे म्हणून अत्यंत प्रियकर असे आहांत. श्लेषःयेथे 'मयूर'शब्दावर कवीने श्लेष योजिला आहे. हा श्लेष पंतांच्या काव्यांतून शेकडों प्रसंगी योजिलेला आढळतो. मेघ पाहून मोराचे मन आनंदित होऊन तो नाचूं लागतो, या सृष्टिचमत्कारापासून कवींनी देवभक्तसंबंध दाखविण्यास ही मेघमयूरांची उपमा फार समर्पक म्हणून योजिलेली दिसते. ७. मोराच्या अंतःकरणास; पक्षी, भक्त मोरोपंत याच्या अं करणास. १८. महादेवा! [हे] शंभो! तुझी दया (कृपा) क्षण (क्षणभर न होवो. न विटो (कंटाळो) माझ्यावरील तुझी दया क्षणभर देखील कमी