________________
१७२ मोरोपंतकृत ध्रुव ध्रुव खरा; स्तवा उचित होय विश्वास तो;। टीका ] ध्रुवाचे सामर्थ्य काय सांगावें? त्याचे वय पाहिले तर केवळ पांच वर्षांचें. २. तीव्र; वय अल्प होते पण त्याची तपश्चर्या किती तीव्र होती! ३. गुरुनारद याच्या वचनावर किंवा परमेश्वराच्या ठिकाणी केवढा दृढविश्वास! क०सं०-ध्रुव अरण्यांत भगवदाराधना करण्यास गेला तेव्हां त्याला तेथें नारदमुनींनी त्याच्या कानांत एक गुरुमंत्र सांगितला व याचा जप कर म्हणजे काही कालानंतर तुला परमेश्वराचे दर्शन होईल असे सांगितले. या गुरुनारदाच्या बोलण्यावर ध्रुवानें पूर्ण विश्वास ठेवून मंत्रजप केला व भगवद्दर्शन करून घेऊन सायुज्यता मुक्ति मिळविली. प्रथमचरणाचा अर्थः-ध्रुव जरी वयाने लहान होता तरी त्याच्या वयाच्या मानाने त्याची तपश्चर्या फार कडकडीत होती व त्याचा गुरुवचनावर एकनिष्ठ विश्वास होता. १. ध्रुव हा भक्त. २. निश्चयी. ध्रुव खरोखरीच ध्रुब (निश्चयी). येथें 'ध्रुव' शब्दावर कवीने श्लेप केला आहे. ध्रव म्हणजे शाश्वत किंवा नित्य कवि. म्हणतातःध्रुव हा ध्रुव (शाश्वत, अचल, मनोवृत्तिचांचल्यरहित, निश्चयवान्). नांवास खरोखरीच योग्य होता. क०सं०:-'देव कसा आहे, तो कोठे वसे,' असें सुनीति मातेला विचारून ध्रुव भगवत्प्राप्ति करून घेण्याकरितां घराबाहेर पडला. ही बातमी उत्तानपाद राजाला कळली तेव्हां तो घाबरला व सर्व सौख्याचे मूळ बाळ माझें, ध्रुव गेला ? घेणार राज्यओझें' असे म्हणत तो त्याच्या पाठीमागे गेला. 'माझें सर्व राज्य मी तुझ्या स्वाधीन करितो, तू मागें फिर' असे त्याने ध्रुवाला सांगितले व इतर पुष्कळ रीतीने त्याची मनधरणी केली, पण ध्रुवाचा नि श्चय फिरल नाहीं सारेवनात गेला. येउनानपारून त्यान भगवत्कृपा ५ कलाह वाला येथें खरा' म्हणजे निश्चयाची केवळ मूर्तिच असे म्हटले आहे. ध्रुव हा ध्रुव खरा, या वाक्यांत निरुक्ति नामक अलंकार झाला आहे. ध्रुव हा ध्रुव म्हणजे शाश्वत, अढळ, स्थिर, खरा असा अर्थ विवक्षित आहे, म्हणून तेथें निरुक्ति अलंकार झाला आहे. 'योगवशे नामांचा कल्पिति अन्यार्थ तरि निरुक्ति घडे । यापरिच्या चरितांहीं तूं दोपाकर असें गमे उघडे ॥ (अ. वि.) योगवशे अवयवार्थानें. 'हेतुस्तव, नामाची अन्वर्थकता निरुक्ति ती होते।सीतारन निघाले पृथ्वींतुनि तरिच रत्नगर्भा ते'॥ (श्री. वि.प.) नामाच्या अवयवार्थानें अन्यार्थाची कल्पना केली असली किंवा काही कारणास्तव नामाची अन्वर्थता दाखविली असली म्हणजे निरुक्ति होते. 'ह्याच गुणांनीं तूं दोषाकर आहेस असे वाटतें'-या उदाहरणांत दोषाकर ( दोषांची खाण; पक्षी, रात्री प्रकासमान हाणारा चद्र) शब्दाच्या अर्थाची अन्य कल्पना केली आहे. याचें सलक्षण उदाहरण अथ निरुक्ति:- हेतुना येन केनापि योगेनान्वर्थता यदि । नाम्ना चेत्कल्प्यते यत्र निरुक्तिस्तत्र कीर्तिता. ॥ यद्गर्भात्कन्यकारलं लेभे जनकभूपतिः । तस्मादस्या भुवो नाम रत्नगर्भेति सार्थकम् ॥ १९९ ॥ [ मंदारमरंदचंपू-पृ० १४९.] ३. स्तवनास, स्तुतीस. ४. ज गास. सर्वविश्वानें ध्रुवस्तवन करावे अशी जी ध्रुवाची योग्यता तिला तो पात्र | (योग्य) आहे. द्वितीयचरणाचा अर्थः-पांच वर्षांचा बालक असून सद्गुरु नारद