पान:केकावलि.djvu/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७१ केकावलि. किती वय ? कसें तप प्रैखर ? काय विश्वास तो? ओळखी अक्षरीं ॥ ४ ॥ नाहीं विवेक या ठायीं । आत्मा अनात्मा तें कांहीं ॥ ५ ॥ कांहीं नव्हे तुका । पायां पडेन हे ऐका ॥ ६ ॥ केकासौंदर्यः-मी अल्पशक्ति असूनही जर तुम्ही मला ध्रुवाप्रमाणे जन्ममरणाच्या फेऱ्यांतून सोडवून अक्षय शांतिपद देत असला तर अशी ह्या दीनावर महत्कृपा करण्यास आपण मुखत्यार आहां असा येथे कवीच्या हृदयांतील आशय दिसतो. ध्रुवाविषयी चार शब्दः-वेद, ब्राह्मण व पुराणग्रंथ यांतील पुष्कळ प्राचीन कथांची उत्पत्ति आकाशांतील चमत्कारापासून आहे. (१) ऐतरेय ब्राह्मण, तैत्तिरीय ब्राह्मण व महाभारत यांत सांगितलेली 'मृगाच्या पाठीस लागून त्याच्या पोटांत त्रिकांड वाण मारणाऱ्या रुद्रव्याधाची कथा,' (२) 'दक्षकन्या स्वाहा हिने साहा वेळां सहा ऋषिपत्न्यांची रूपें धरून अनीशी समागम गेला व वीर्य सप्तषींच्या सुवर्णकुंडांत टाकिले. त्यापासून कार्तिकस्वामी झाला. पुढे त्या ऋषिपत्न्या नक्षत्रमंडळांत सहा कृत्तिका होऊन राहिल्या.' ही महाभारतातील कथा, (३) वाल्मीकिरामायणांत सांगितलेली 'खालीं तोंड करून आकाशांत लोंबकळणाऱ्या त्रिशंकुराजाची गोष्ट,' (४) तैत्तिरीय संहितेतील 'प्रजापतीने चंद्रास आपल्या ३३ कन्या (२७ नक्षत्रे व ६ कत्तिका) दिल्या. त्यांतील रोहिणीवर मात्र त्याची अत्यंत प्रीति होती. म्हणून चंद्रास क्षयरोग झाला' असें वर्णन, (५) 'गुरुपत्नी तारा हिचे हरण चंद्राने केले आणि तिला त्यापासून बुध पुत्र झाला' हे पौराणिक कथानक, (६) 'मंगळ हा पृथ्वीचा व शनि हा सूर्याचा पुत्र ही समजूत,' इत्यादि कथांचा उगम आकाशांतील ज्योतींचे आकार, त्यांची स्थिति व गति यांपासूनच आहे. वरील कथांप्रमाणे ध्रुवाख्यानाच्या मुळाशी देखील ज्योतिषशास्त्रांतील 'सर्व तारांच्या मध्ये खुंटासारखा असणारा सर्वांचा नायक' जो ध्रुव तारा तोच आहे. 'ध्रुवाला भगवंतांनी अढळपद देऊन नक्षत्रे व ग्रह तुला प्रदक्षिणा करितील असा आशीर्वाद दिला. म्हणूनच ध्रुवाला सप्तर्षि प्रदक्षिणा करितात. त्याच्या पत्नीचे नांव भ्रमी. तिजपासून त्याला कल्प व वत्सर असे दोन पुत्र झाले.' हे पौराणिक वर्णन ध्रुवताऱ्याच्या वर्णनाशी चांगले जुळते. तसेंच परमेश्वरांनी देवाला मेरूच्या शिखरावर अढळ पद दिले व त्याच्या भोंवतीं पुष्कळ प्रकाशगोल फिरतात' एवढे वर्णन योगशास्त्रांतही योजिलेले आढळते. योगीजन कपाळाचे मध्यभागी जेथें गंधाचा टिळा लावलेला असतो त्या जागेच्या आंत मेरूचे (पाठीच्या कण्याचें) शिखर आहे असे मानून तेथें कल्पावयाचा नीलवर्ण वायुरूप बिंदु हाच ध्रुव असे मानतात. १. अन्वयः-किती वय? तप प्रखर कसे? तो विश्वास काय? ध्रुव ध्रुव खरा, तो (ध्रव) विश्वास स्तवा उचित होय. तुम्ही प्रकट मेरूशी मोहरी कशी तुळितसां? हो! हरी! [तुम्ही] प्रसाद करितां अधिक उणें नाठवा. प्रास्ताविकः-यांत कवि ध्रुवाच्या योग्यतेचे वर्णन करून त्या मानाने आपण त्याच्यासारख्या कृपेस पात्र नाहीं असें सुचवितात. व्या०:-किती, कसे हे शब्द जवळ जवळ आले आहेत म्हणून ते ध्रुवाच्या व कवीच्या योग्यतेत असलेले महदंतर (मोठे-जमीनअस्मानाचे अंतर) सुचवितात. 'द्वौ कशब्दो महदंतरं सूचयतः' किंवा 'द्वौ क्वशब्दौ प्रयुज्यते अत्यंतासंभवे सदा [रघुवंश-सर्ग हो