पान:केकावलि.djvu/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत मग भारत, मंत्रभागवत, मंत्ररामायण, हरिवंश, कृष्णविजय, इत्यादि त्यांची मोठी प्रकरणे वाचल्यावर 'रुचिरस्वरवर्णपदा' व 'रसभाववती' अतएव ' 'जगन्मनोहारिणी' अशा सुवर्णालंकृत तरुणीच्या दर्शनाचा भास करून देणाऱ्या प्रासादिक काव्यामृताचा त्यांना यथेष्ट आस्वाद घेण्यास सांपडल्यास त्यांत नवल काय ? भारतभागवतादि मोरोपंताची मोठी काव्ये वाचणारांस 'आधींच सोन्याचे, त्यांत जडावाचें । लेणे श्रीमंताचें, शोभिवंत ॥' या सुप्रसिद्ध कविवचनाची पदोपदी आठवण येईल. भारत, मंत्ररामायण, हरिवंश, कृष्णविजय यांतील कांहीं प्रकरणे व पृथुकोपाख्यान, नारदाभ्युदय, भीष्मभक्तिभाग्य, कुशलवोपाख्यान, व अंबरीषाख्यान ही आख्याने वाचणारांस कालिदासाच्या उपमा, भारवीचे अर्थगौरव व समयविशेषीं दंडीचे पदलालित्य या तिन्ही गंगा एकत्र होऊन पंतांच्या काव्यांत त्रिवेणीसंगम झालेला आढळेल. कै. विठोबा अण्णा क-हाडकर, परशुरामपंत गोडबोले, भास्कर दामोदर पाळंदे, दादोबा पांडुरंग, मल्हार वाळकृष्ण हंस, विष्णुशास्त्री चिपळूणकर, शंकर पांडुरंग पंडित, जनार्दन बाळाजी मोडक, हरि माधव पंडित, वामन दाजी ओक, बापूसाहेब पटवर्धन कुरुंदवाडकर इत्यादि रसिकवर्यास ज्यांच्या कवितावधूनें जन्मभर चटका लावून आपल्या भक्तमालिकेंत गोविलें त्या कवीच्या काव्यसौंदर्यास वरीलसारख्या पोकळ टीकांनी तिळभरही कमीपणा येत नसून उलट त्या गालवोटाप्रमाणे रसिकांची मनें काव्यवधूच्या सौंदर्याकडे वेधण्यास मात्र कारण होतात. हा प्रतिकृळ टीकाकारांचा पंतांवर उपकारच समजावयाचा. याचमुळे मयूरकवीची आवड महाराष्ट्रीयांत अलीकडे जास्त जास्त वाहू लागली आहे. त्यावरून ते लवकरच महाराष्ट्रकविवर्याकरितां मांडलेल्या सिंहासनांपैकी एका प्रमुख सिंहासनावर आरूढ होतील असा रंग दिसत आहे. या केकेवरून आणखी एक विशेष गोष्ट समजते ती ही. 'पंतांनी श्लोककेकावलीत कौतुकाने अनेक प्रकारचे उद्गार प्रकट करून चमत्कार केला आहे व व्यंग्याने इष्टार्थ इंगित केला आहे.' याचें ही केका एक सुरेख उदाहरण आहे:-पंतांचे सहृदय टीकाकार कै० हंस लिहितात. 'काव्यप्रकाशादि साहित्यशास्त्रोक्त लक्षणाप्रमाणे श्लोककेकावलि हे उत्तम म्हणजे ध्वनिकाव्य आहे. यांत वाच्यार्थास प्रधानता नसून व्यंग्यार्थास प्रधानत्व आहे. त्याप्रमाणे व्यंग्याने इष्टार्थाची पुष्टि करण्याकरितां सहाव्या प्रमाणांतील केकांत पंताने स्वळपता दाखवून महाजनांचे भय मानितो असे लिहिले आहे. तो खरोखरच मंदमति, अपंडित, अकुशल होता किंवा महाजनांचे भय आपण अज्ञान म्हणून बाळगीत होता असे त्याच्या या केकांवरून दिसत नाही. जो खरोखर पंडितांचे भय बाळगील तो आपल्या कवितेत समजन उमजन दोष ठेवून त्याविषयी आपण पंडितांचे भय बाळगतो म्हणून कशाला लिहून ठेवील? यायें भयाचा उल्लेख केला आहे ती स्थले दोषाची आहेत काय ? अथवा तेथें दोप आहे असे तो समजत होता काय? जर दोष आहे असे त्यास वाटले असते तर दोषाची दुरुस्ती त्याला करितां - येत नव्हती काय? तेव्हां त्याने बुधजनांचे महत्व आणि भय में प्रदर्शित केले आहे, ते आपण पंडित, अकुशल यास्तव चुकीला पात्र आहों अशा हेतूने केलेले नाही व त्या वाक्यांतील थिोवर प्रधानत्वही नाही हे बारीक विचाराने मनांत येते. वर्णनीय वस्तूचें (भगवत्कथांचें) व दाखविण्याच्या मुख्य उद्देशाने तिचे वर्णन करीत असतां जें जें म्हणून उपमान