पान:केकावलि.djvu/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. गोष्टीची अतिशय स्तुति मात्र होत होती. व कोणत्याहि विषयावर स्वतंत्र ग्रंथ रचण्याचे सामर्थ्य मंडळीच्या अंगांत नसल्यामुळे ते जुन्या संस्कृत कवींच्या ग्रंथांचीच मराठीत हुबेहुब नकल करीत असत. याला उदाहरण मोरोपंताचे. त्याचे ग्रंथ पुन्हां पुन्हां किती वेळ जरी वाचले तरी त्यांत नवीन कांही आढळत नसून जुन्या कवींचे शिळे विचार भपकेदार व कृत्रिम रीतीने दर्शविलेले मात्र आढळतात. ते वाचून खऱ्या रसिकांस त्याच्या काव्याचा तिटकारा मात्र येतो. (2) Moropant has undoubtedly great command of the Marathi language, which he sometimes prostitutes by indulging in such poetical conceits as acrostics, and by writing without the use of the labial letters, introducing the conjunction via (but) into every line, and by commencing each line of his verse by the last word of the preceding line. He is the lord of the Arya metre, in which he copiously writes, with power and ease, drawing his ideas from the Ramayan, Mahabharata and Bhagwat, so often mentioned as the sources of Maratha excitement and but seldom improved upon either in thought or feeling. One of his books held in most estimation is the Mayur Kekavali, Trumpeting of the Peacock, so called from his own name.' (Dr. Wilson in the introduction, to Dr. Molesworth's Marathi into English Dictionary.) याचा सारांश:-'मोरोपंताला मराठी भाषा उत्तम अवगत होती. परंतु त्याने तिचा काही ठिकाणी 'निरोष्ठ' 'परंतु' इत्यादि नियमित अक्षरें साधून काव्यरचना करण्यांत अपव्यय केला आहे. आर्या छंदांत त्याने पुष्कळ काव्यरचना केली व त्यांत कविता करणे त्याला चांगले साधले होते. रामायण, भारत, भागवत या ग्रंथांतील विचार घेऊनच त्याने काव्यरचना केली आहे. तरी त्यापेक्षां विशेष चांगले वर्णन किंवा चांगले विचार त्याच्या काव्यांत आढळत नाहीत. केकावलि हे त्याचे काव्य लोकांच्या फार आदरास पात्र झाले आहे.' 'पोवाडे' प्रसिद्ध करणाऱ्या आकर्थ साहेबांनी 'एलफिन्स्टन कॉलेज युनियन' पुढे दिलेल्या 'मराठी कवि'वरील आपल्या (3) व्याख्यानांत वरच्यासारखेच उद्गार काढिले आहेत. कै. कृष्णशास्त्री चिपळूणकर मोरोपंताला कवि समजत नसत हे त्यांच्या सुप्रसिद्ध चिरंजीवांनीच प्रसिद्ध केले आहे. या कवीवरील इतर आक्षेपकांचे अभिप्रायही ह्या पुस्तकांत मागे दिले आहेत. मोरोपंतांवरील आक्षेप वाचून सुचलेले दोन विचारः-मोरोपंताची कविता ज्यांनी सूक्ष्मदृष्टीने पाहिली असेल त्यांना वरील आक्षेप वाचून हसू येईल व कदाचित् थोडासा रागही येईल. संस्कृतज्ञ वाचकांनी पंतांची 'मुक्तामाला' व 'कृष्णस्तवराज'ही दोनच लघु संस्कृत काव्ये जरी वाचिली तरी त्यांना त्यांत कल्पकता, रचनाचातुर्य, प्रसाद, व सहृदय कवित्व हे गुण आढळतील. प्राकृत लघु काव्यांपैकी आर्याकेकावली, श्लोककेकावली, नामरसायन, संशयरत्नावली, मुरलीपं. चक, नामसुधापंचक, रामरीति, सत्संगस्तव, सन्मनोरथराजि, विठ्ठलविज्ञापना व विश्वे. शस्तुति ह्यांपैकी एखाददुसरे पंतांचे काव्य वाचले असतांही वाचकांस स्वतंत्र स्फूर्ति, कल्पकता, प्रेमल प्रसाद, प्रौढ व मार्मिक शब्दयोजना इत्यादिः उत्तमकाव्यास मंडित करणारे गुणगण त्यांत खचित आढळून शिवाय त्यांत उत्कट भक्तिप्रेमहि आदोल