पान:केकावलि.djvu/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. शस्त्र अथवा गोळे भलता प्रकार । परिसी संस्कार सकळही हेम ॥ २ ॥ महापुरी जैसें जातसे उदक । मध्ये ते तारक नाव जैसी ॥ ३ ॥ तये नावेसंगें ब्राह्मण तरती। केंवि ते बुडती अनामिक ॥ ४ ॥ नाना काष्टजात पडतां हुताशनीं । ते जात होऊनि एकरूप ॥ ७ ॥ तेथे निवडेना घुरे की चंदन । तैसा वर्णावर्ण नामीं नाहीं ॥ ५ ॥ नामामृतें झालें मुळींचे स्मरण। सहज साधन तुका म्हणे ॥ ६ ॥ (८) ब्राह्मण तो याती अंत्यज असतां । मानावा तत्वता निश्वयेसीं ॥१ रामकृष्णनामें उच्चारी सरळें । आठवी सांवळे रूप मनीं ॥ २ ॥ शांति क्षमा दया अलंकार अंगीं। अभंग प्रसंगी धैर्यवंत ॥ ३ ॥ तुका म्हणे गेल्या पडऊमी अंगें। सांडुनियां मग ब्रह्मचि तो ॥४॥ (९) ब्राह्मण तरि एक नरहरि सोनार । ज्यासाठी शंकर माथां राहे ॥ १ ॥ ब्राह्मण तरि एक सजना कसाई । चक्रधारी गृहीं मांस विकी ॥२॥ तुका म्हणे ब्रह्म जाणे तो ब्राह्मण। येरातें नमन करा परतें ॥ ३ ॥ (१०) ब्राह्मण ते कोण म्हणावे कोणासी। सांगावे आम्हांसी कृपानिधी ॥ १ ॥ वेदाचे वचन आठउनी मनी ! बोलावी ते वाणी सत्यंजय ॥ २ ॥ असत्य बोलतां पूर्वजां दूषण । पहा विचारून श्रुतीमध्ये ॥ ३ ॥ अंघोळी ती धोत्रे लेतां आभरण । काय इतर जन न करिती ॥४॥ टिळे माळा मुद्रा नित्य करी स्नान । नव्हती ब्राह्मण निश्वयेसीं ॥ ५ ॥ बाबाजीसद्गुरुदास तुका म्हणे । पुढील कारण सांगों आतां ॥ ६॥ (११) सोनियाचे श्वान भाळींचा मुगुट । एकचि कनक मोलें घेता ॥ १ ॥ दुध तापविलें सोनियाचे भांडीं । मातिचिये हांडी स्वाद एक ॥२॥ ऊंसाचा परिपाक शूद्रे गुळ केला। ब्राह्मणी रांधिला स्वाद एक ॥ ३ ॥ गाईचि जाती असती नानावर्ण । दुधा शुभ्रपण सारिखेंचि ॥ ४ ॥ तुका म्हणे ऐसा भावार्थ कारण । जाती थोर, हीन नाहीं देवा ॥ ५ ॥ (१२) उत्तम त्या याती । देवा शरण अनन्यगती ॥ १ ॥ नाही दुजा ठाव । कांहीं उत्तम मध्यम भाव ॥ २ ॥ उमटती ठसे । ब्रह्मप्राप्ति अंगी दिसे॥ ३ ॥ भाविक विश्वासी । तुका म्हणे नमन त्यांसी ॥ ४ ॥ (१३) अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड। काय त्यासी रांड प्रसवली ॥१॥ वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयतां कुळयाती ॥ २॥ ऐसा हा निवाडा झालासे पुराणीं। नव्हे माझी वाणी पदरची ॥३॥ तुका म्हणे आगी लागो थोरपणा, दृष्टि त्या दुर्जना न पडो माझी ॥ ४ ॥ (१४) पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथे हानि घेती जन्म ॥ १ ॥ कर्म, धर्म त्याचे झाला नारायण, त्याचेनि पावन तिन्ही लोक वर्णअभिमानें कोण झाले पावन । ऐसें द्या सांगून मजपाशीं ॥ ३ ॥ अंत्यजादि योनि तरल्या हरिभजनें । तयांची पुराणे भाट झाली ॥ ४ ॥ यातायाती धर्म नाहीं विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीं ॥ ५ ॥ तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ । तारिले पतित नेणों किती ॥६॥ (१५) 'हृदया स्मर त्यांसि, असो श्रीभगवद्भक्त जाति भलती बा' (सन्मणिमाला-गी. ९७ १३), (१६) 'परिस अयाचा उडवी सद्भाव, तसाचि भक्त यातीस' (तुकारामस्तुति-गी । पृ० २७). त्याचप्रमाणे श्रीमद्भागवत एकादशस्कंध, शेखमहंमदकृत 'योगसंग्राम' एकनाथीभाग वगैरे ग्रंथांत हेच तत्व प्रतिपादिले आहे. तसेच इतर अर्वाचीन संतांचीही याविषयी वचने आहेत ती त्यांच्या ग्रंथांत शोधक वाचकांस सांपडतील. ७. तिळमात्र देखी ष्कळ