पान:केकावलि.djvu/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत वोलत आहे. ती म्हणते 'अहम् एव स्वयम् इदं वदामि जुष्टं देवेभिः उत मानुषेभिः । यं कामये तं तं उग्रं कृणोमि तं ब्रह्माणं तं ऋषिं तं सुमेधाम्'. अर्थ:- हे माझें स्वतःचें वचन आहे, [आणि] तें देवांस आणि मनुष्यांस संमत आहे, [की] जो मला आवडतो त्याला [मी] बलवान् करितों, जो मला आवडतो त्याला [मी] ब्राह्मण करितों, जो मला आवडतो] त्याला [मी] ऋषि [करितों] [आणि जो मला आवडतो] त्याला [मी] बुद्धिमान् [करितों]. ' (वेदार्थयत्न अंक ६ पृ० ३४२ टीप] (२) 'वज्रसूचिकोपनिषदां'त 'ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चार वर्णीत ब्राह्मण प्रधान मानिला आहे, पण ब्राह्मण कोणाला म्हणावें? जीव, देह, जाति, ज्ञान, कर्म, व धार्मिक यांपैकी कोणाला ब्राह्मण म्हणावें?' या प्रश्नांचा पृथक् पृथक् विचार करून वरीलपैकी एकाही वस्तूंत ब्राह्मण्य नाहीं असें ठरविलें, व शेवटी 'जो अद्वितीय, जातिगुणक्रियाहीन, पडूमिरहित, सत्यज्ञानानन्दानन्तस्वरूप, अशेषभूतांतर्यामि, निर्विकल्प, अशेषकल्पाधार, अप्रमेय, अनुभवैकवेद्य, अपरोक्षतया भासमान अशा आत्म्याला जाणतो तोच ब्राह्मण समजावा' असा सिद्धांत केला. (३) महाभारतांतर्गत वनपर्वांत नहुपयुधिष्ठिरसंवादांत सर्पदेहधारी नहुषाने ब्राह्मण कोणास म्हणावें? असा धर्मराजास प्रश्न केला. तेव्हां 'सत्य, दान, क्षमा, अहिंसा, तप, उत्तम शील व दया हे गुण ज्यांत असतील त्यांस ब्राह्मण म्हणावें' ('तोचि ब्राह्मण जेथें क्षांति, दया, दान, सत्य, तप, शील.-मोरोपंत) असें धर्माने उत्तर दिले. त्यावर 'शूद्रकुळांत उत्पन्न झालेल्या मनुष्याच्या अंगांत जर सत्य, दान, क्षमादि वर सांगितलेले गुण असतील तर तो ब्राह्मण होईल किंवा नाही?' असा नहुषाने फिरून धर्मास प्रश्न केला. तेव्हां 'जी शूद्राच्या ठायीं लक्षणे असावी ती नसून सत्यादिक लक्षणे जर त्याचे ठिकाणी असतील तर तो ब्राह्मण समजावा, व उलट ब्राह्मणकुलोत्पन्न असून कामक्रोधादिक शूद्राची चिन्हें त्याच्या अंगांत असतील तर तो शूद्र समजावा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे जातीने होत नसून कर्मानेंच होतात. ब्राह्मणादि जाति ईश्वरनिर्मित नसून मनुष्य, पशु, पक्षी वगैरे जाति मात्र ईश्वराने उत्पन्न केल्या असे समजावें' असा युधिष्ठिराने आपला अभिप्राय सांगितला (वनपर्व अ० १८० पहा) (४) 'न शूद्रा भगवद्भक्ता विप्रा भागवताः स्मृताः । सर्ववणेषु ते शूद्रा अभक्ता वैजनार्दने॥' (पुराण), (५) कृष्ण अर्जुनास म्हणतात:-'अगा कुळाचिया चोखटपणा नलगा । आभिजात्यु झणां श्लाघा । व्युत्पत्तीचा वाउगा । सोस कां वहावा ॥ ४३१ ॥ कणेंवीण सोपटें । कणसें लागली घनदाटें, । काय करावें गोमटें । वोस नगर ॥ ३३ ॥ तैसें सकळ ते वैभव । अथवा कुळजाति गौरव । जैसें शरीर आहे सावेव । परि जीवचि नाहीं ॥ ३५ ॥ तैसें माझिये भक्तीविण । जळी ते जियालेपण । अगा! पृथ्वीवरी पापाण । नसती काई ॥ ३६ ॥ तैसें भक्तिहीनाचे जिणें । जो स्वप्नींहि परि सुकृत नेणे । तेणें संसारदुःखासी भाणे । वोगरिले ॥ ४० ॥ म्हणोनि कुळ उत्तम नोहावें । जाती अंत्यजही व्हावें । वरि देहाचेनि नांवें । पशूचेंहि लाभो ॥ ४१॥ म्हणोनि कुल जाति वर्ण । हें आघवेंचि गा! अकारण । एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक ॥ ४५६ ॥ (ज्ञानेश्वरी अ० ९ लो० ३१,३२ वरील टीका) (६) ज्यासि आवडि हरिनामाची । तोचि एक बहू शुचि ॥ १॥ जपतो हरिनाम बीज । तोचि वर्णामाचि द्विज ॥ २ ॥ तुका म्हणे वर्णधर्म । अवर्षे आहे समब्रह्म ।। ३ ।। (७) नामधारकासि नाहीं वर्णावर्ण । लोखंड प्रमाण नाना जात ॥१॥