पान:केकावलि.djvu/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत शिशूसि जरठांसही निरखितां रैसें दाटती; । ढुंहोत भैलते सदा, तरि न लेशही आटती; द्रोणपर्व-अ० १२ गी० १६०.] (स.) चांगल्या. प्रथमचरणार्थः-या भगवत्कथारूपी कामधेनू आमच्या मातेपेक्षा आम्हाला जास्त स्नेहा अशा वाटतात. (९.) आमच्या जन्म देणाऱ्या मातांपेक्षा व्यु:-जीपासून प्राणि उत्पन्न होतात ती-माता. १. वृद्धांस, वयातीतांस. द्वितीयचरणार्थः-मातांपेक्षा जास्त चांगल्या वाटण्याचं कारण ह्या लहान मुलांस व वृद्धांस अशा दोघांनाही पाहून पान्हावतात. आमच्या आया लहान मुलांस स्तनास लावून मात्र दुग्धे करून दाटतात (पान्हावतात). पण या भगवत्कथा कामधेनु तर लहान मुले, तरुण मुलगे व म्हातारेकोतारे अशा सर्वांना केवळ पाहूनच पान्हावतात. तेव्हां ह्या आमच्या मातांपेक्षा अधिक स्नेहाल म्हटल्या पाहिजेत. भावार्थः-भगवत्कथांस बाल, तरुण, वृद्ध अशी सर्वस्थितीची माणसे सारखींच प्रिय वाटतात व त्यांच्या योगाने सर्व प्रकारच्या माणसांचा उद्धार होतो. २. पाहून. (ॐ) दुग्धानें; पक्षीं, भक्तिरसाने. ४. परिपूर्ण भरितात. ५. दोहन करणे हे आटण्यास कारण होय, परंतु कितीही दोहिल्या तरी त्या सामान्यधेनूप्रमाणे आटत नाहींत. त्यांची पूर्व अवस्था कायमच आहे-असे वर्णन आहे म्हणून हा पूर्वरूप नामक अलंकार होय. [मंदारमरंदचंपू-पृ० १४४.] ६. ओळखीचे अनोळखीचे असे कोणीही. तृतीयचरणार्थ:-परिचित अपरिचित कोणीही या भगवत्कथाकामधेनूचे दूध काढो, त्या पान्हा चोरित नाहीत. धेनु भलत्यास दोहूं देत नाहीत, पण ह्या कथासुरभि ओळखी अनोळखी अशा दोघांसही दूध काढू देतात. साधारण धेनु फक्त दिवसांतून दोन तिनदांच दूध देतात, पण ह्या कथासुरभीचें दुग्ध सदा (दिवसभर सारखें) काढीत बसले तरी ते आटत नाही. भगवत्कथा स्त्रिया, शूद्र, विद्वान्, मूढ, ब्राह्मण, चांडाल अशा सर्वांचा सारखाच उद्धार करितेः-भगवंताची कथा कोणत्याही जातीच्या मनुष्याने-मग तो मनुष्य वर्णगुरु ब्राह्मण असो किंवा वर्णाधम शूद्रातिशूद्र असो-ऐकिली तरी तो पापविमुक्त होतो; तसेच त्या दिवसरात्र सारख्या ऐकत बसलों तरी आपणाला त्यांचा कंटाळा यावयाचा नाहीं; कारण एक तर भगवद्गुणकथा असंख्य आहेत, व दुसरें त्याच त्याच कथा फिरून फिरून ऐकल्या असतां रसिक श्रोत्यांला त्यांचा त्रास न येतां उलट त्यांपासून नवी नवी गोडी प्राप्त होते. केका १०० व १०१ यांत हेच सांगितले आहे. भगवत्कथेत विशेष तो हाच आहे की आब्राह्मणचांडालांनी तिचे पारायण केले तरी ती त्या सर्वांना सारख्याच रीतीने पापनिर्मुक्त करिते. वेद, शास्त्रे, व उपनिषदें इत्यादि ग्रंथ स्त्रीशूद्रांनी वाचूं नयेत, वाचल्यास त्यांना मोठे पाप लागते असा पुष्कळ ग्रंथांत निषेध केला आहे. कांहीं वैदिक सूक्तें स्त्रियांनी रचिलीं असून गार्गीवाचक्नवी, सुलभामैत्रेयी, वडवाप्रातिथेयी अशा काही स्त्रिया उत्तम ब्रह्मनिष्ठ म्हणून नावाजल्या गेल्या तेव्हां वरील निषेध अमळ चमत्कारिक दिसतो. आर्यसमाजाचे वंद्य संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती ह्यांनी मात्र स्त्रीशूद्रांना वेदपठण करण्यास हरकत नाहा असे आपले मत दिले. स्त्रीशद्रांनी वेदपठण करूं नये ह्या मताचा ज्ञानदेव, एकनाथ,