पान:केकावलि.djvu/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. म्हणे, 'त्यजुनि का मला निजधना, पैरस्वा दुहीं ?' ॥ ५७ कथासुरंभि या भल्या स्वजननीहुनी वाटती; भक्तिरस. १०. आपल्यास हितकर. ११. गोड, मधुर. द्वितीयाधांचा अर्थः-भगवकथारूपिणी कामधेनूचे दूध आरोग्यकारक, पुष्कळ व गोड असे जरी आहे तरी विषयवासना गाढवी, 'मी तुमच्या सत्तेची आहे म्हणून कामधेनूला टाकून मलाच दुहा,' असें म्हणते. १. 'म्हणे' या क्रियापदाचा कर्ता 'खरी' समजावा. २. 'की' असें पाठांतर आहे. ३. आपल्या सत्तेच्या द्रव्याला-वस्तूला. ४. येथे 'पर' शब्द श्लिष्ट आहे. पर (दुसऱ्याचे)+ स्व(द्रव्य) दुसऱ्याचे द्रव्य, दुसऱ्याच्या द्रव्याला-वस्तूला. 'कामधेनू ह्या परपुरुषाच्या (ईश्वराच्या, पक्षी इतर पुरुषाच्या) आहेत; त्या किती जरी चांगल्या असल्या तरी त्यांच्या दुग्धाचा स्वीकार न करितां मी जी तुमच्या सत्तेची आहे, त्या माझ्या दुधाचाच तुम्ही आस्वाद घ्या' असें विषयवासना खरी आग्रहाने सांगते. केकामाधुर्य:येथे कवीने विषयवासनाखरीच्या मुखांत कथासुरभींचा रस सेवन न करितां माझाच सेवन करा असे सांगतांना मोठे समर्पक कारण योजिले आहे. लौकिक व्यवहार असा आहे की एखादी वस्तु किती जरी बहुमोल व बहुगुणी असली, तरी ती जर परक्याची असेल, तर लोक तिची परवा न करितां आपल्या सत्तेच्या अल्पमोली व अल्पगुणी वस्तूचाच आदर करितात. गरीब प्रामाणिक शेतकरी आपल्या सत्तेच्या कांबळीला श्रीमंताच्या शालजोडीपेक्षा, आपल्या अंगावरील फाटक्या रकट्याला राजवस्त्रापेक्षां, आपल्या जेवणाच्या थाळीला व पाणी पिण्याच्या गाडग्याला श्रीमंताच्या रत्नखचित सुवर्णपात्रांपेक्षां व निजायाच्या तरटाला पराच्या गाद्या आंथरलेल्या छप्पर पलंगापेक्षाही जास्त समजतो. तसेच सद्गुणी लोक अंगच्या सुवर्णाने अंगावर घातलेल्या सुवर्णरत्नालंकारांनाही लाजविणाऱ्या अशा दुसऱ्याच्या मदनमंजरी सुंदरीकडे न पाहतां आपल्या स्वतः च्या साध्याभोळ्या स्त्रीच्या ठिकाणींच रत असतात. म्हणूनच खरी म्हणते की-माझ्यांत जरी कामधेनूसारखे गुण नसले तरी मी तुमच्या सत्तेची आहे हे ध्यानांत आणून तुम्ही तिचा त्याग करून माझाच स्वीकार करा. कवि ह्मणतात:-देवा ! अशा वरकांती सयुक्तिक दिसणाऱ्या विचारसरणीने ही विषयवासना खरी आम्हांस मोड़ पाडून आमचे मन भगवत्कथारूपिणी कामधेनूपासून परावृत्त करिते, अशी हिची आम्हांला गांजणूक आहे म्हणून नाश करून हिच्या तडाक्यांतून आम्हांला सोडवा. दि) दहतां-दोहन करतां. (६. या कथासुरभि स्वजननीहुनी भल्या वाटती, [या] शिशूसि जरठांसही निरखितां रसें दाटती, भलते [त्यांस] सदा दुहोत, तरि लेशही न आटती, स्ववत्समल भक्षिती परि सर्वथा न बाटती-असा अन्वय. प्रास्ताविक: भगवत्कथा ह्या कामधेनूपेक्षाही श्रेष्ठ असें दर्शवीत होत्साते कवि त्यांचा स्तव करितात. K७. कामधेनु. भगवत्कथेला दिलेली कामधेनूची उपमा फार सरस आहे व पंतांनी सत्यसपना अन्यत्र हीच उपमा दिलेली आढळतेः-सत्पुरुषकथा अद्भुत रसदा, म्हणतों हिलाच सुरभी मी.