पान:केकावलि.djvu/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२) रुद्रासारख्या वैदिकग्रंथाचा अर्थ सांगण्यापूर्वी भाष्य पाहून ठेविले पाहिजे, दुसरा एखादा संस्कृत ग्रंथ दिल्यास त्याचा अर्थ यथाशक्ति सांगेन अशी पंतांनी विनंति केली. ती ऐकून जवळच शिवकवचाची पोथी होती त्याचा अर्थ सांगण्यास नाइकांनी पंतांस सांगितले. तेव्हां मूळश्लोक वाचून त्याचा अर्थ लागलाच मराठी श्लोक शार्दूलविक्रीडित छंदांत रचून पंत सांगू लागले. याप्रमाणे सर्व शिवकवचाचा व पुढे दुसऱ्या खेपेस रामरक्षेचा अर्थ पंतांनी नाईकांस सांगितला. त्यावरून नाईकांस अतिशय संतोष होऊन त्यांनी पंतांस आपल्या वाड्यांत पुराण सांगण्यास ठेवलें. वेतनाचे ठरले नव्हते. पंत कुटुंबासुद्धा निराळ्या वाड्यांत राहात. त्यांच्या जवळ दहावीस माणसें होती. यजमानाच्या कोठीतून भरपुर शिधा येई. ते द्रव्य देत व लग्नकार्यादिप्रसंगी पूर्ण साह्य करीत. पंतांचे ज्येष्टबंधु राघोपंत किंवा सोनोपंत यांजलाही नाईकांनी आश्रय देऊन त्यांला आगळगांवची फडनविशी सांगितली. नाईक पंतांस जाहगीरही करून देत होते. परंतु त्यांनी ती घेतली नाही. यापुढे पंत आपला वेळ कीर्तनपुराणश्रवणांत, भक्तिपर ग्रंथ वाचण्यांत, कविता रचण्यांत व पुराण सांगण्यांत घालवू लागले. यजमान बाबुजी नाईक वर्षांतून आठ महिने खारीस जात व पावसाळ्यांत चातुर्मास बारामतीस राहत. तेव्हां पंत त्यांस हरिवंशादि ग्रंथांचें पुराण सांगत. पंताचे संस्कृताचें अध्ययन उत्कृष्ट असून ते फार चतुर, समयसूचक, मार्मिक, मितभाषी पण मुद्देशीर भाषण करणारे असल्यामुळे त्यांचे पुराणास रंग येऊन श्रोत्यांची अतिशय दाटी होई व ते पुराण ऐकून भक्तिसुखसमुद्रांत तल्लीन होऊन काही वेळ तरी या नश्वर संसाराला कंटाळून विरक्त वनत. पंतांची विद्वत्ता, त्यांचे सौजन्य व त्यांची सदाचरणप्रियता पाहून वारामतीकरांच्या कुटुंबांतील माणसांचा, त्यांच्या आश्रितांचा व गांवांतील सर्व जातींच्या आवालवृद्धांचा त्यांच्यावर फार लोभ असे. वाबूजी नाईकांचे मध्यमपुत्र पांडुरंगराव यांचें व पंतांचे परस्पर फार प्रेम होतें. पंतांनी वारामतीकरांची चाकरी पुष्कळ वर्षे केली. त्यांचे आपल्या यजमानाविषयी फार प्रेम होतें ह्मणून ते एक दोनदां दुसरीकडचा थोर आश्रय मिळत असतां तो न पतकरतां बारामतीसच आपल्या यजमानाजवळ राहिले. पेशवे होण्याच्या अगोदर दुसरे वाजीराव साहेव हे भाउबीजेकरितां एकदां वारामतीस आले असतां तेथें नाईकांचे पदरी मोरोपंत पराडकर मोठे विद्वान् गृहस्थ आहेत असे पाहून त्यांना आपल्याजवळ ठेवण्याची इच्छा रावसाहेबांनी नाईकांस कळविली. त्याजवर नाईकांनी आमच्या येथे पंत आश्रयाने राहात नसून आमाच त्यांचे आश्रित आहों, तेव्हां याजविषयी आपण पंतांस विचारावें, ते कोणत्याही कामी स्वतंत्र आहेत असा जवाब दिला. त्यावरून पंतांस विचारतां त्यांनी नाईकांस सोडून जाण्याची आपली इच्छा नाही असे सांगितले. नंतर आमांस एकदां आपण पुराण तरी सांगावें असें रावजींनी झटले. त्यावर पंतांनी यजमानास आपण पुराणास असल्यावर दुसरे कोणी असले तरा चिता नाही असे सांगितले. त्यावरून वाजीरावास फार राग आला. शिवाय बारामतीकराशी त्यांचे वैमनस्य असल्यामुळे पंत त्यांचे आश्रित ह्मणून ते पंतांचा व त्यांच्या काव्यांचा फार द्वेष करूं लागले. ह्या गोष्टीच्या ऐतिहासिक सत्यत्वाविषयी शंका घेण्यास बरीच जागा आहे. तरी वृद्धकथेचा तिला आश्रय असल्यामुळे ती येथे दिली आहे. पंतांचे देखील बाजी