पान:केकावलि.djvu/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११) समकालीन ताहराबादकर प्रसिद्ध संतभक्त महिपति यांचे ग्रंथ त्यांनी ऐकिले व वाचिले होते. पंतांचे शिकणे संपल्यावर पन्हाळगडी काही दिवस ते मुजुमदारीच्या कामावर असतांना यांना एकदां हिशेबांत पाव आण्याची चूक लागली. पुष्कळ वेळ रात्रीचें जाग्रण करून उलट सुलट हिशेब केल्यावर शेवटी एकदांची चूक उमगली, तेव्हां त्यांनी आनंदाने टाळी पिटली. ही गोष्ट त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास कळली तेव्हां 'पाव आण्याची चूक शोधून काढण्याकरितां जर तूं चित्ताची एकाग्रता करून एवढे परिश्रम केलेस, व ती शोधून काढल्यावर तुला एवढा आनंद झाला, तर मग ह्या संसाराची जी मोठी चूक आपल्या प्रत्येकाच्या हातून घडत आहे, ती दुरुस्त करण्यासाठी जर तूं परमेश्वराची अनन्यभावें भक्ति करून ती चूक काढून टाकलीस तर तुझ्या जन्माचे कल्याण होऊन तुला महदानंद प्राप्त होईल' असे ते बोलले. तेव्हां ह्या आमच्या मोरोवा कारकुनास उपरति होऊन त्यानें त्याच वेळेस कानावरील वोरूची लेखणी अधिकाऱ्याच्या पायांवर वाहिली व इतःपर कारकुनी न करितां भगवद्भक्ति करण्याकडे आपले आयुष्य खर्चावयाचे असा आपला निश्चय त्यांस सांगितला. पंत पाध्यांकडे शिकत असतांनाच वडील रामाजीपंत पन्हाळगडची आपली नौकरी सोडून वारामतीस बाबूजी नाईकाच्या येथे आश्रयास राहिले होते. वरील गोष्ट झाल्यावर पंत वरेच दिवसांपासून बारामतीस जाऊन राहिलेल्या आपल्या वडिलांच्या भेटीकरितां पन्हाळ्याहून सुमारे चोवीस वर्षांचे वय असतां वारामतीस गेले. ५ बारामतीकरांचा आश्रय. 'श्री बाबूराय प्रभु माझा अत्यंत सदय अन्नद, हा । अर्थिजनां न ह्मणो दे तैसा, तप्तास जेंवि सनद हा ! ॥ (विष्णुपद. ८) भीष्मद्रोणसम गुणें शांडिल्यसुगोत्रपद्मरवि, दे हा । आश्रय शंकर जैसा उपमन्युमना मयूरकविदेहा. ॥ (स्वर्गा. २.३६) पंत बारामतीस बाबूजीनाईक जोशी यांजकडे जाऊन आठपंधरा दिवस झाल्यावर त्यांनी यजमानांचें लक्ष्य आपल्याकडे जावें ह्मणून एक चमत्कारिक युक्ति काढिली. यजमानांच्या घरच्या बायकामुलींना जात्यावर किंवा झोपाळ्यावर वसून ओंव्या ह्मणतांना पाहून त्यांनी मी तुमाला पतिव्रता स्त्रियांची गाणी रचून देतों ती तुह्मी ह्मणाल काय असें विचारिलें असतां वायकामुलींनी 'होय' ह्मणून उत्तर दिले. त्यावरून पंतांनी बायकांच्या ओव्यांच्या चालीवर 'सीतागीत,' 'रुक्मिणीहरणगीत,' व 'सावित्रीगीत' अशी तीन गाणी रचून दिली. मुलींना व बायकांना ही गाणी आवडून झोपाळ्यावर बसल्या ह्मणजे किंवा दळतांना पंतांच्या ओव्या त्या ह्मणूं लागल्या. त्या यजमानांच्या कानी पडल्या. त्याबद्दल चौकशी करितां रामचंद्रपंतांचे चिरंजीव मोरोपंत यांनी त्या ओव्या केल्या असे कळून त्यांस फार संतोष झाला. यानंतर काही दिवसांनी नाईकांचे जवळच्या मंडळीने रामचंद्रपंतांचे चिरंजीव मोरोपंत मोठे विद्वान् असून ते आज काही दिवस पंक्तीस असतात असें • यजमानांस कळविले. त्यावरून संध्येच्या वेळी पंतांस नाईकांनी बोलावून सर्व हकिकत विचारली व जवळ रुद्राची पोथी होती तिचा अर्थ सांगण्यास पंतांस सांगितले. त्यावर