पान:केकावलि.djvu/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ मोरोपंतकृत धरील मन? आधिनें बहु परिभ्रमे चौकसें. ॥ कृतांतकटकामलध्वजजरा दिसों लागली; ३. घटकेचा. 'मन घडीचा भरंवसा कसें धरील!' धरणार नाही-हें उत्तर. जेथें क्षणाचा भरंवसा धरवत नाहीं तेथें घटकेचा भरंवसा कसा धरवेल? अर्थात् धरवणार नाही. असा येथे प्रश्नालंकार जाणावा. १. दःखाने. 'आधिनें चाकसें बहु परिभ्रमे' हे मन काळजीने-सर्व नाशवंत आहे तेव्हां माझें कसे होईल, माझा उद्धार होईल किंवा नाहीं-या मानसिक व्यथेनें चाकाप्रमाणे अतिशय भ्रमण पावतें, किंवा शारीरिक पीडांनी त्रस्त होते. म्हणून मी स्वोद्धाराविषयी अधीर झालो आहे. हा माझ्यांत दोष नसून गुणच होय. यास्तव देवा! माझा आपण क्षणाचाही विलंब न लावतां उद्धार करा. Compare: Thus mortals blind and weak below, Pursue the phantom bliss in vain; The world's a wilderness of woe, And life's a pilgrimage of pain. James Montogomery. २. येथे मनास चाकाची उपमा दिली आहे. यांत 'सें' हा प्रत्यय उपमाबोधक होय. 'मन' हे उपमेय, 'चाक' उपमान, 'परिभ्रमण' हा साधारण धर्म, अशा चान्ही गोष्टी उपस्थित आहेत म्हणून ही पूर्णोपमा झाली. केका २१, पृ० ५७, टीप २ पहा. ३. प्रास्ताविकः-स्वोद्धाराविषयी इतका उताविळ होण्याचे आणखी एक कारण कवि प्रकट करतात. कृतांत (यम) त्याचे कटक (सैन्य) त्याचा अमलध्वज (पांढरें निशाण) तद्रूप जी जरा (वार्धक्य); मृत्युसैन्याचे पांढरें निशाण में म्हातारपण अथवा त्यामुळे केसांस आलेली पांढुरकी ती दिसू लागली; ह्मणजे म्हातारपणामुळे आलेली केसांची पांढुरकी ही मृत्यु जवळ आला आहे हे सुचवू लागली. सैन्याचे निशाण दिसू लागले म्हणजे सेनानायक जवळ आला असें जसे अनुमान करितां येते, तद्वत् केस पांढरे झाले ह्या गोष्टीवरून मृत्यु समीप येत आहे असे कळते. येथे जरेला कृतांतकटकाचा शुभ्रध्वज म्हटले आहे. जरावर्णनः-(१) 'पुरे करा या मौजा तेथुनि फौजा झाल्याचि रवाना । यमदताची हाल विनीवर बाल सफेती देखाना.' (रामजोशी 'दो दिवसांची' ही लावणी) ।, (२) एकनाथी भागवतांतील पुढील छोटासा उतारा यासंबंधी फार वाचनीय आहे:-त्या तारुण्याची नवाळी । देऊनि फेडितां काळ गिळी। मग जरा जर्जरित मेळीं । मरणकाळी पातली. ॥ ९.२६४ धवल चामरेंसि आले जाण । जरा मृत्यूचे प्रस्थान । मागूनि यावया आपण । वेळा निरीक्षण करीतसे.॥ २६५. सर्वांगी कंपायमान । तो आला मृत्युव्यजन । मान कांपे तो जाण । डोल्हारा पूर्ण चा. ॥ २६६. दांत पाडूनि सपाट । काळे मोकळी केली वाट । मृत्युसेनेचा घडघडाट । रखावया ॥ २६७. पाठी झाली दुणी। तेचि मृत्यूची निशाणी। दोनी कानी खिळे