पान:केकावलि.djvu/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत तुवां हैरिमदापहें बृहदुदारलीलाकरें.। समुद्धरसि एकटा जरि जैडासि या कर्दमी, (उचलली तेव्हां) प्रिय आपणहि रथावरूनियां लवला- [कृष्णविजय-अ० ६७ गी०१२ उत्तरार्थ.] (२) सज्ज करुनि ऊचलितां चापभरें कंप सखि! शिरे अंगी. [कृष्णविजय-उत्तरार्ध-अ० ७५ गी०६०.] १. हरि (इंद्र)+मद (गर्व)+अपहें (हरण करणाऱ्याने) इंद्राचा गर्व हरण करणाऱ्या (तुवां); अपह (अप-हन्) म्हणजे नाशक, घातक. हा शब्द हन् (मारणे, नाश करणे) या धातूला 'अप' उपसर्ग लागून झाला आहे. वृत्रहा (वृत्रहन्-इंद्र), शोकापह (शोकापहन् =शोकनाशक), तमोपह (सूर्य) इत्यादि अन्य शब्द अशाच प्रकाराने झाले आहेत. ही सर्व कर्तृवाचक नामें आहेत. येथे कृष्णाने गोवर्धनपर्वत उचलून इंद्राच्या गर्वाचा नाश केला ह्या कथेकडे लक्ष्य आहे. या कथेची विशेष माहिती केका ५, पृष्ठ १५, टीप २ यांत दिली आहे. 'हरिमदापहें' हे विशेषण अचल उचलण्याचे कारण दाखविणारे आहे म्हणून हा काव्यलिंग अलंकार होय. [केका ८ पृ० ३० टीप २ पहा.] २. बृहत् (अतिशय)+उदार (हितकर)+लीला (जगदुत्पत्त्यादि आश्चर्यकारक क्रिया)+आकर (खाण) जो तूं त्या त्वा. सृष्ट्युपत्त्यादि अद्भुत क्रिया ईश्वराकडून घडतात त्या केवळ लीलेनेच. सृष्टयुत्पत्त्यादि अद्भुत चमत्कार करणाऱ्या तुम्हीं इंद्राचा गर्व हरण करावा या इच्छेनें एकट्याने गोवर्धनपर्वत उचलिला ही गोष्ट कांहीं खोटी नव्हे, खरी आहे. 'बृहदुदारलीलाकरें' हे पद अचल उचलिला-या अर्थाचे पोषक आहे म्हणून साभिप्राय आहे, तेव्हां परिकर अलंकार झाला आहे. परिकराचे एक उदाहरण:-'जो भूतसुहृत् काढी व्याघाचा कळवळोनि कांटा की.' (सन्मणिमाला). ३. उद्धार करशील. गोवर्धनपर्वत उचलून मिळविलेल्या कीर्तीपेक्षा माझा उद्धार केल्यास तुमची जास्त कीर्ति होईल असें कवि या शेवटल्या दोन चरणांत दाखवितात. ४. एकाकी, दुसऱ्या कोणाच्या साह्यावांचून. 'एकदां' असाही दुसरा पाठ आहे, त्यांत सौरस्य नाही. 'एकदां समुद्धरशील तर तुला मर्द म्हणेन' यांत मर्द म्हणण्याजोगा पराक्रम नाही. एकटा म्हणजे असहाय असून जर जडाचा उद्धार करशील तर तुला मी मर्द म्हणेन यात मदेपणा आहे. 'एकदां' म्हणजे 'एकदांचा' (एक वेळ नव्हे) असा अर्थ घेतला असता, 'एकदा हा पाठ स्वीकारार्ह दिसतो. 'जरि या जडाला एकदा म्हणजे (एकदांचा) समुद्धरसि तरि तुला भला मर्द म्हणेन.' 'एकदां' म्हणजे 'एकदांचा' असा अर्थ 'जा एकदां निघून,' 'एवढे जर एकदा कराल तर तुमचा पराक्रम खरा' इत्यादि वाक्यांत दिसून येतो. आणि तो येथे घेतला तरी चालेल. ५. जड मूर्ख; जडपदार्थ. 'जड' शब्द येथे श्लिष्ट आहे. या शब्दावर पंतांनी पुष्कळदां श्लेषयोजना केलेली आढळते. श्लेषालंकाराचा तपशील:-'नानार्थसंश्रयः लेषो वावर्योभयाश्रितः । सर्वदो माधवः पायात् स योऽगं गामदीधरत्' (कुवलयानंद). 'प्रकृताअकृतोभयगत बव्हर्थ श्लेष विबुध संमत तो । सुशरण देवो-माधव अचला सुरवाहिनीस बारता ॥ १ ॥ हरिणे संयुत ऐशा जलजासम मुख तुझें सुतेजाळ । कीलाल बहुत फार वाहिनीपाळ ॥ २ ॥ अनेकार्थ शब्दांची रचना ती 'श्लेष' अलंकार