पान:केकावलि.djvu/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. ११७ ह्मणे नमुनियां सुंदुस्तरविपन्नदीसेतुला. ॥ ४२ नेव्हे अनृत, सत्य तें, अंचल ऊँचलीला करें १. सु+दुस्तर+विपत्+नदी+सेतुला तरावयास अत्यंत कठीण अशी जी विपत्तिरूप नदी तिचा सेतु (पूल) जो तूं त्या तुला. भगवन्नाम हे दुःखरूप समुद्रांत सेतूप्रमाणे उपयोगी पडते. माझ्या हातून नानाप्रकारची असंख्य पातकें घडली आहेत व मी केवळ शूद्रस्त्रीशी रत होणाऱ्या अजामिळाचा सखाच शोभलों म्हणून देवा! तुम्ही मला पापरूप विपत्तींत सेतूप्रमाणे होऊन माझा उद्धार करा एवढी माझी आपणास प्रार्थना आहे. भगवद्भक्तांस पश्चात्ताप झाला म्हणजे त्यांस आपली पापें डोंगराएवढी मोठी (जरी ती रेणुप्रमाणे लहान असली तरी) दिसू लागतात त्याचे हे एक प्रमाण आहे. तुकारामाच्याही अशाच प्रकारच्या उक्ति आहेत, त्यांपैकी एक पुढे देतो:-'मी तों अपराधांची राशी । शिखा अंगठनो पाशीं ॥.' 'मोजू शकेल गगनीं भगणासि कोणी । ऐसा असेल अणु जो गगनासि आणी । मद्दष्कृतें कवण मोजिल फार काळीं । रामा नव्हेल गणना वदतो त्रिकाळीं ॥ ३५ ॥ (हरिराजकत शमार्या' भाषांतर). व्यंकटेशस्तोत्रकार म्हणतात:-'माझिया अपराधांच्या राशी। भेदोनि गेल्या गगनासी । दयावंता हृषीकेशी । आपुल्या ब्रीदासी सत्य करीं ॥.' ' For Thy name's Sake, O Lord, pardon my iniquity ; For it is great.' (Ps. XXV.) Ô trore बाली प्रभस प्रार्थना. तोच पुढे आपल्या पापांबद्दल ह्मणतोः= 'For mine iniquities are come over mine head : as an heavy burden they are too heavy for me.' (Ps. 38.) येथे मी आपलाच घातक आहे म्हणून विविध पातके जोडिलीं असा दुसऱ्या वाक्याचा पहिले वाक्य हेतु दिला आहे, यास्तव हा हेतु अलंकार जाणावा. चवथ्या चरणांत रूपक आहे. २. (प्रास्ताविक):-'पूर्वी तुम्ही पुष्कळ पाप्यांचा उद्धार करून आपला पराक्रम गाजविलात, पण मजसारख्या पापकर्दमांत खोल रुतलेल्या मनप्याचा उद्धार केला नसेल, म्हणून ही परीक्षेची वेळ आहे अशा अभिप्रायाने कवि म्हणतात.' बृहदुदारलीलाकरें हरिमदापहें तुवां करें अचल ऊचलिला ते सत्य, अनत नव्हे. जरि या जडासि कर्दमी एकटा समुद्धरसि, तरि मी तुला भुवनत्रयीं भला म्हणेन-असा अन्वय. ३ असत्य, खोट. अन् (नाही)+ऋत (सत्य)-सत्य नाही ४. पर्वत. 'अद्रिगोत्रगिरिग्रावाचलशैलशिलोच्चयाः' इत्यमरः. 'चल' (हालचाल) नाहीं तो 'अचल.' अर्थसंदर्भाने गोवर्धनपर्वत. ५. अंगुलीवर धारण केला. कवितेत शब्दांस -हस्व किंवा दीर्घ ईकार योजण्याची चाल आहे. या नियमास अनुसरून ऊचलिला, उचलिला, ऊपडिला उपडिला, अशी रूपे होतात. तात्पर्य येथे न्हस्व 'उ'कारास्तव दीर्घ 'ऊ'कार घातला आहे. संस्कृतांतील शब्द प्राकृतांत येतांना असा नियम आढळतो की पुढील संयुक्ताक्षराच्या योगाने मागील स्वरास दीर्घत्व देऊन संयुक्ताक्षरांतील पहिल्या वर्णाना लोप होतो; जसें पत्तन-पाटण, हस्त-हात, कर्म-काम, उच्चलित ऊचलित, उष्ण-ऊन नि पीठ इ०. याची उदाहरणे पंतांच्या काव्यांत बरीच सांपडतातः-(१) माळा मालिनी