पान:केकावलि.djvu/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तापट होता. श्रीरामचंद्र हे पराडकरांच्या घरचे आराध्यदैवत होते. श्रीराम हे मोठे पितृभक्त होते. त्याप्रमाणेच मोरोपंताची निष्ठा आपल्या वडिलांचे ठिकाणी फार होती. ह्यांची बुद्धि मोठी तीव्र असून ह्यांना लहानपणापासूनच पुराणकीर्तनश्रवणाचा फार नाद होता. त्यामुळे अल्पवयांतच भारत, भागवत, रामायण, पुराणादि ग्रंथांची यांना चांगली माहिती झाली. यांचे अगदी पहिले शिक्षक त्यांचे वडिल रामाजीपंत होत. त्यांच्याजवळच हे वाळपणी लिहिणे वाचणे, व रामरक्षादिस्तोत्रे शिकले व अमळ मोठे झाले तेव्हां कारकुनांच्या फडावर बापाजवळ बसून त्या वेळच्या कारकुनास अवश्य तो सर्व जमाखर्ची हिशेव ते शिकले. ४ मोरोपंतांचा विद्याभ्यास. गुरु माझे श्रीराम श्रीमत्केशव, गणेश-हरि चवघे.' ॥ (गंगावकिली १०९) 'श्रीकेशवं श्रीगणेशं । वंदे विद्यागुरुं हरिं.' ॥ (संस्कृतमंत्ररामायण) ____ आपल्या बापाशिवाय पंत लहानपणी 'हरि' नामक गुरुजवळ शिकले. यांनीच पंतांचें उपनयन झाल्यावर त्यांना ब्रह्मकर्म, विष्णुसहस्रनामादि स्तोत्रे व बालबोध व मोडी अक्षर घटविण्यास शिकविले असावें. पंढरपुरास पंतांचे हातचे लिहिलेले ग्रंथ आहेत त्यांवरून त्यांचे मोडी व बालबोध अक्षर चांगले वळणदार व घटींव होते, तसेंच ते फार बारीक अक्षर लिहित असून अनुस्वाराबद्दल वर्तुल काढित असें दिसून येते. पुढे ते कोल्हापुरप्रांती आपल्या विद्वत्तेबद्दल गाजलेले प्रख्यात पंडित केशव पाध्ये व गणेश पाध्ये यांचे जवळ पन्हाळगडी संस्कृत काव्यनाटकव्याकरणालंकारादि शिकण्यास राहिले. पाध्यांच्या घरी पंत शिकावयास राहिले यासंबंधी एक मौजेची आख्यायिका सांगतात. पंत चवदा वर्षांचे होते तेव्हां एकदां द्वादशीचे दिवशीं ब्राह्मण ह्मणून पाध्ये यांजकडे जेवावयास गेले. जेवण झाल्यानंतर रिकामपणी त्या दिवसाचे प्रसंगास अनुसरून त्यांनी एक सुंदर श्लोक रचिला, व तो त्यांनी पाध्याचे ओटीचे भिंतीवर लिहून ठेविला व घरी निघून गेले. असे दोन तीन वेळां झाले तेव्हां पाध्यांनी चौकशी केली. तेव्हां ते श्लोक रामाजीपंत मुजुमदाराचा मुलगा मोरोबा याने रचिले असे समजले. त्यावरून त्यांनी रामाजीपंतास बोलावून तुमचा मुलगा मोठा वडिमान् आहे, त्याला आमच्याकडे संस्कृत शिकण्याकरितां पाठवित जा ह्मणून सांगितले. पाया घराणे अदिलशाहीत चांगले प्रख्यात असून त्यांस यवनांकडून उत्पन्न होतें. गणेशपाध्ये व केशवपाध्ये हे उभय बंधु पन्हाळ्यास आले. दोघांसही क-हाडाकडे पंतप्रतिनिधीकडून व कोल्हापुरच्या महाराजांकडून जमिनी मिळाल्या. ह्यांचे पूर्वज कोंकणांत रत्नागिरी जिल्ह्यांत - ब्रज गांवीं राहणारे. त्यांचे उपनांव गोळवलीकर. हे काश्यपगोत्री कन्हाडे ब्राह्मण. दोघेही बंध मोठे विद्वान् होते. त्यांतल्या त्यांत गणेश पाध्ये हे विशेष जाडे विद्वान् होते. ते न्यायव्याकरणमीमांसादि शास्त्रांत अत्यंत प्रवीण असून मोठे निस्पृही व नेमनिष्ट होते. कोल्हापरच्या राजवाड्यांत हे पुराण सांगत. यांच्या हस्ताक्षराशी पंतांच्या हस्ताक्षराचें वरेंच सादृश्य दिसते या उभयतां बंधूंचे वंशज पन्हाळगड, कोल्हापुर, कन्हाड वगैरे ठिकाणी आहेत. केशव ध्यांचे पुत्र सदाशिव पाध्ये हे पंतांचे सहाध्यायी होते. पंतांनी थोडेसें संस्कृत व्याकरण अगो