________________
कुटुंबासुद्धा घाटावर कोल्हापुरप्रांती आले. तेथे प्रथम ते कोल्हापुर दरवारी मुजुमदारीच्या कामावर खुद्द पन्हाळगडावरच चाकर राहिले. यांचा स्वभाव फार कडक होता. एकदा यांनी आपल्या मोतद्दारास काही अपराधास्तव पैसा तापवून डाग दिला; तेव्हां राजाने मात्र करावयास योग्य असा दंड आपण आपल्या सेवकास केला याबद्दल आपणांस शासन होईल या भीतीने त्यांनी कोल्हापुरकरांची नौकरी सोडून पुण्याहून सुमारे तीस कोसांवर वारामती नामक गांव आहे तेथे ते गेले. वारामतीस वाबूजी नाईक जोशी (शांडिल्यगोत्री कोंकणस्थ ब्राह्मण) ह्मणून कोणी जहागिरदार सरदार राहत असत. यांच्या पदरीं रामाजीपंत हे पागेच्या कामावर कारकून ह्मणून राहिले. हे वावूजी नाईक छत्रपति शाहू महाराजांच्या पदरीं एक नामांकित सरदार असून पहिल्या वाजीराव पेशव्यांच्या मरणानंतर पेशवाईकरितां नानासाहेबांचे (बाळाजी बाजीरावांचे) प्रतिस्पधी होते. पुढे हे माधवरावसाहेब पेशवे ह्यांच्या कारकीर्दीत रावसाहेब पेशवे अज्ञान असतांना त्यांच्या तर्फच्या सरदारांपैकी एक असून त्यांचे रघुनाथराव दादासाहेब व त्यांचे दिवाण सखाराम बापु यांशी वैमनस्य होते. वारामतीकर हे पेशव्यांचे आप्त होते. बाळाजी विश्वनाथ पेशवे ह्यांची कन्या भिऊताई ही , वाबूजी नाईकाचे बंधु आवाजी नाईक यांस दिली होती, नाईक हे कोट्याधीश सावकार होते. वाजीराव पेशव्यांस पैशाची मदत यांजकडून होत असे. तसेंच राघोबा दादांची कन्या दुर्गावाई ही बाबूजी नाईकाचे मध्यमपुत्र पांडुरंगराय यांस दिली होती. (इ. स. १७७२) आईचे अघोर कृत्य हिला न आवडल्यामुळे ती बारभाईस अनुकूल होती. पुरंदरीं राघोबाचे पक्षाची ह्मणून हिला नारायणराव पेशव्याची पत्नी गंगाबाई हिच्या प्रसूतकाली नेली होती. आनंदीबाईस तिचा राग येऊन तिने बाजीरावास तिची खोड मोडण्याविषयीं निक्षून सांगितले होते. त्यावरूनच त्याने पुढे वारामतीकरांचा वाडा लुटून जहागिर जप्त केली. (ऐतिहासिक गोष्टी भा. १ पृ. ५०) व त्यांच्या कुटुंबास काशीवास करावयास लाविलें. यांचे वंशज बारामतीकर, मेडतकर, बावडेकर या नावाने पुण्यास हल्ली प्रसिद्ध आहेत. ('परिशिष्ट-आ,२' पहा.) ३ जन्म व बाळपण. 'धन्य श्रीराम पिता, धन्या लक्ष्मी प्रसू जगी झाली, । . आली सत्यवतीची, की भारतकीर्ति सुतमुखी आली.' ॥ (स्वर्गा. २.४२) 'सुयशें पितृमातुलकुलउज्वलकर तनय तो असावा गे !' (द्रोण. ८.२३). रामाजीपंत पराडकर कोंकणांतून पन्हाळगडी आपली पत्नी लक्ष्मीबाई हिला बरोबर घेऊन आले ह्मणून वर सांगितलेच आहे. लक्ष्मीबाई ह्या सुशील व सात्विकवृत्तीच्या असून पतिसेवापरायण होत्या. हिच्यापासून रामाजीपंतांस तीन पुत्र व एक कन्या अशी चार अपत्य झाली. वडील पुत्राचे नांव सोनोपंत असून धाकट्याचे आबा होते. त्यांचे मध्यम उन मारापत हेच प्रकृत चरित्राचे नायक होत. यांचा जन्म शके १६५१ सौम्यनाम राह्मणजे इसवी सन १७२९ त पन्हाळगडी झाला. हे आपल्या वडिलांजवळ लहानाचे मोठे झाले. यांची प्रकृति जात्या अशक्त असून स्वभाव बापाप्रमाणेच