पान:केकावलि.djvu/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत नको, न संजवे, असा बहुत काय मी दुष्कृती ? ॥ ३७ आवडली, पसंत पडली. तृतीय चरणाचा अर्थः-देवा! तुम्ही कसे? तर रमाकांत. त्या तुम्हांला यःकश्चित् दासी आवडावी काय? बरे ती दासी तरी कोणाची? तर तुमचा वैरी जो कंस त्याची. तेंही असो. तिच्या रूपलावण्याला प्रसन्न होऊन तिचा तुम्ही अंगीकार केला असावा असे म्हणावें तरी पंचाइत. कारण ती तर अत्यंत कुरूप-अष्टवक्रा-अशी होती. तेव्हां देवा! तुम्ही केवळ त्या कंसदासी कुब्जेचा तिच्या निर्मल भक्तीस्तवच स्वीकार केला असे सिद्ध होते. असे जर आहे, तर मग प्रभो! माझ्या भक्ताची, साधारणपणे रूपवती, तुम्हांलाच वरूं इच्छिणारी कुलीन, अशी जी कवितासुता तिचे पाणिग्रहण तुम्ही कां बरे करूं नये? अवश्य करावें. ह्या चरणांतील पदयोजना फारच खुबीदार आहे. ३४-३९ ह्या केकेंत पंतांची प्रतिभा फारच उज्वल झालेली दृष्टीस पडते. गोपी कुब्जाकृष्णांच्या प्रेमाबद्दल चरफडतांना म्हणतातः-(लावणी) 'मी म्हणतें ग बाई! उत्तम कुळींचा कां रतला बटकीपाशी । पांडवघरचा खासदार हा ती कंसाघरची दासी । योग्य जाहला संग म्हणावा काय गडे या दैवासी। कुणि उद्धरितो जन्मा येउनि कुणि आपुलें घर नाशी॥ दासीच्या शिरला घरीं । तिचि याची काय तरी सरी । दासीचा बंदा हरी । काय मी सांगू तरी' (रामजोशी-'हरिवांचुन इ० ). ४. दासी. 'बटिक' शब्द निंदागर्भ आहे व तशा अर्थाने त्याचा येथे उपयोग केला आहे. असाच उपयोग अन्यवही पंतांच्या काव्यांत आढळतो. [हरिवंश-अ० १५ गी० २२, आदिपर्व-अ० ४ गी० ६७] ५. माझी कृति, माझी कवितावधू. पंतांचे आपल्या काव्याविषयी काही उद्गारः-पंत कृष्णविजयपूर्वार्धातील अंतिम 'सज्जनप्रार्थनें'त म्हणतात:-'नसे तादृक् चेतोहर गुण जरी साधु तरि या। वरू चूडारत्नीकृत विधुहि जैसा धुतरिया;। भले सद्विद्यांचे नद करिति ते लोभ, विहिरा । तयांचा मी; का जडहि घडला शोभवि हिरा ॥ २ ॥ अभय दिधलें आहे, वाह अतिप्रतिभा झरा; विधुमणिचिया सारा ताराप कारण पाझरा। जडहि कविता जोडी गोडी गुणा हरिच्या बरी; सहज तुमचा दीना हीना प्रसाद समुद्धरी. ॥ ३ ॥ १. आपल्यास आवडत नाही म्हणून 'नको'. २. माझ्या कवितावधूला सजवत नाही म्हणतां, कुब्जा त्रिवका असून तीस आपण सरळ केले आणि माझ्या कवितेस सुरूप करवत नाही म्हणतां हे कसे? 'रेणुस करिल सुमेरू प्रभु रेणुचि करिल की सुमेरूस' [महद्विज्ञापना-१३६]. अशी आपली कीर्ति सुप्रसिद्ध असून माझ्या कवितासुतेला साजरी करण्याचे काम होत नाही असे कसे म्हणतां ? 'प्रभुला किमपि न दुर्घट, भारी गरुडास काय हो चिमणी ? [महद्विज्ञापना-११५] या न्यायाने मत्कृतीला सजवणे आपणास अत्यंत सुकर आहे-असा म्हणण्याचा भाव. ३. असा (अशा प्रकारचा) बहुत (मोठा) दुष्कृती (पापी, अपराधी, दोषी) मी (मोरोपंत कवि) आहे काय ? तुम्ही माझ्या कवधूचा स्वीकार करूं नये असे कोणतें पाप मजकडून घडले? माझी कवितावधू माळी आहे म्हणून आपल्यास आवडत नाही आणि तिला आपल्याच्याने दही करवत नाही असा मीच काय मोठा दोषी आहे ते सांगा. या केकेंत 'स्वरिपुची,