पान:केकावलि.djvu/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. १०३ येद्रिया तद्वत् अतींद्रियशरीरिका ॥ ३. यथा भुजंगाः सर्पाणामाकाशं विश्य पक्षिणाम् । विदंति मार्ग दिव्यानां दिव्या एव न मानवाः ॥ ५. अन्यच्च सर्ववेदानामधिष्ठाता चतुर्मुखः । गायत्री ब्रह्मणस्तद्वदंगभूता निगद्यते ॥ ७. अमूर्त मूर्तिमद्वापि मिथुनं तत्प्रचक्षते । विरिंचिर्यत्र भगवांस्तत्र देवी सरस्वती । भारती यत्र यत्रैव तत्र तत्र प्रजापतिः ॥ ८. वेदराशिः स्मृतो ब्रह्मा सावित्री तदधिष्ठिता । तस्मान्न कश्चिद्दोषः स्यात्सावित्रीगमने विभोः (मत्स्यपुराण अध्याय ३, ४). (२) शंकरांनी केलेला त्रिपुरांचा नाश (केका ७२ तील कथासंदर्भ पहा) या कथेतील रूपक हरिवंशांत उत्तम रीतीने सोडविलेले आढळते. तसेंच (३) 'गणपति उंदरावरून पडला तेव्हां त्याला चंद्र हंसला, (४) 'चंद्रानें गुरुपलीशीं गमन केले, (५) गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन करूं नये,'(६) अगस्त्य ऋषीने समुद्र प्राशन केला' इत्यादि गोष्टींत सुंदर आध्यात्मिक रूपकें गोंविली आहेत. कै. विष्णुबोवा ब्रह्मचारी कृत 'वेदोक्त धर्मप्रकाश' या ग्रंथांत, स्वामी विवेकानंद यांच्या ग्रंथांतून व मासिक पुस्तकांतन, म्याडम ब्ल्हाव्हाटस्कीच्या ' Isis unveiled ' या उत्तमोत्तम ग्रंथांत, तसेच ह्या युगांतील गागी मिसेस बिझांट हिच्या ग्रंथांतून अशा प्रकारच्या पुष्कळ गोष्टींची रूपकें उलगडून दाखविली आहेत. या दृष्टीने अहल्याधर्षणकथेचा विचार केला म्हणजे त्याचे पुढील समाधान सुचतें. (७) 'अहल्या याचा अर्थ 'नांगरली नाही अशी जमीन' असा होतो. ती गौतम ऋषीच्या मालकीची असावी. इंद्र अथवा सूर्य (वेदांत इंद्र व सूर्य यांना एकच मानतात) ही पर्जन्याची देवता. तेव्हां 'इंद्राने गौतमभार्या अहल्या भोगिली' याचा अर्थ 'इंद्राने गौतम ऋषीच्या काही कारणामुळे न नांगरलेल्या अशा शेतावर मेघवृष्टि करून ते सुपीक केलें' असा होऊ शकतो. किंवा 'अहल्या' या शब्दाचा 'रात्र' असा अर्थ कोणी कोणी करितात. तो इष्ट मानल्यास पुढीलप्रमाणे अर्थ बसतो. इंद्र अथवा सूर्य उगवला म्हणजे दिवस होतो. दिवस हा रात्रीच्या पाठोपाठ येतो म्हणून इंद्र हा रात्रीचा पाठलाग करितो, यास्तव तो तिचा जार आहे अशी कल्पना बसली असावी. याला एक अप्रत्यक्ष प्रमाण असें आहे की ऋग्वेदमंडल १ सूक्त ६९,५ यांत सूर्यरूपी इंद्राला 'उषो न जारो,' उषेचा जार' असें म्हटले आहे. मण्डल १ सूक्त ९२,११ यांत उषेला योषा जारस्य' म्ह. 'सूर्यरूप जाराची प्रिया' असे संबोधिले आहे. मण्डल १ सूक्त ६९,१ यांत 'एखादे स्त्रियेचा जार जसा तिच्या मागून जातो तसा प्रभातकाळी उषेच्या मागून उगवून आकाशांत चालणारा जो सूर्य' असे म्हटले आहे. तसेच वेदांत उषा आणि रात्र यांस परस्पर बहिणी असे म्हणण्याचा प्रचार आहे. या रात्र व उषा नेहमी एकत्र असतात, एकमेकांला सोडित नाहीत हे होय. यावरून इंट याला 'रात्र' व 'उपा' या दोघी बहिणींचा जार म्हणत असावेत. तसेंच अहल्या ही प्रजापतीला कन्या असें पुराणांत सांगितले असून वेदांतही 'रात्र' व 'उपा' ह्या 'ध' म्हणजे आकाश याच्या कन्या म्हणून वर्णन केले आहे. तेव्हां अशाच गोष्टीवरून सूर्यरूपी इंद्राला अहल्यारूपी रात्रीचा जार म्हणत असून त्यावरच अहल्याधर्षणाची कथा रामायणांत रचलेली असावी. अहल्योद्धारकथेत इंद्राचे नीचत्व व विष्णूचें श्रेष्ठत्व वर्णिले आहे. याचप्रमाणे पुराणांतील इतर कथांत इंद्रापेक्षां उपेंद्राचेंच माहात्म्य अथिक सांगितले आहे. प्रत्येक अवतारकथेत इंद्रादि देव ब्रह्मादेवाला पुढे करून श्री महाविष्णूला क्षीरसागरी शरण गेले असें निरूपण असते. वेदांत याच्या उलट प्रकार आढळतो. 'मोठमोठे वृत्रहननादिक पराक्रम इंद्राने केले व त्याला मरुतांनी व विष्ण