Jump to content

पान:केकावलि.djvu/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत मंत्र २). वैदिक ऋषींच्या सूक्तांचा वरवर जरी विचार करून पाहिला तरी त्यांत सौंदर्य, प्रसाद, सरळभक्तिभाव, निष्कपट भजन, अनन्यप्रेमयुक्त देवस्तवन, स्वाभाविक वर्णन इत्यादि प्रकार आढळतात. अमानुषचमत्कार करण्याची शक्ति, विलक्षण तपःसामर्थ्य व देवांपेक्षा वरचढ असें पुण्य इत्यादि पौराणिक ऋषींत दिसून येणाऱ्या गोष्टींचा त्यांच्या ठिकाणी अभाव दिसतो असें वैदिक पंडितांचे मत आहे. वेदांत देवांचे वर्तन निष्कलंक असेंच आढळून येते व इंद्रादि देवांनी सन्मार्ग दाखवून आपल्या सारख्या दीनमर्त्यांचे कल्याण करावे म्हणून गौतमादिकांनी त्यांची स्तुति केली आहे. तोच इंद्र पौराणिक ग्रंथांतून अहल्येशी जारकर्म केल्यामुळे 'सहस्रभगांकित हो' असा गौतम ऋषीपासून शाप पावणारा व यज्ञमंडपांत अश्वाचे रूप धरून जनमेजय भार्या वपुष्टमा हिच्याशी संभोग करून सत्रास विघ्न आणणारा, त्वष्टयाचे पुत्र वृत्र व त्रिशिरा यांचा वध करून ब्रह्मवधाचे पातक करणारा (ऋग्वेदांत इंद्रकृत वृत्रवध हे सुंदररूपक आहे), शुकविश्वामित्रादि तपस्वी तपश्चर्या करित असतां ते इंद्रपद हिरावून घेतील ह्या भीतीने वसंत, काम व अप्सरा यांना पाठवून त्यांच्या तपास विन्न करणारा, दुर्वास ऋषीचा अपमान केल्यामुळे त्याच्या । शापाने व अहल्येचें पातिव्रत्य भंग केल्यामुळे गौतमऋषीच्या शापाने पदभ्रष्ट होणारा, अनंगरंगांत सदैव दंग होणारा, अतिशय कपटी, परोत्कर्षासहिष्णु असा वर्णिला आहे. तेव्हां वैदिक व पौराणिक काळाच्या इंद्रवर्णनाचा मेळ कसा घालावा ? यांतील बीज असे दिसते की वेदांतील ईश्वराचे अतिसूक्ष्म वर्णन मनावर जास्त चांगलें ठसावे म्हणून तें पुराणांतून गोष्टींच्या द्वारा वर्णिले असावें. पुराणांतील कित्येक गोष्टी ईश्वरी ज्ञानाची उत्कृष्ट रूपकें ह्मणून सांगितलेल्या आढळतात. (१) 'ब्रह्मदेवाने आपल्या कन्येशी गमन केलें' ह्या बाह्यात्कारी निंद्य कथेतील रूपकाचे मत्स्यपुराणांत स्पष्टीकरण केले आहे. 'पुराणा'च्या आरंभी 'ब्रह्मदेवांनी आपल्या कन्येशी गमन केलें' ही कथा मत्स्यरूपी भगवंतांनी मनूस सांगितली. तेव्हां असला घोर अपराध ब्रह्मदेवांनी कसा केला ह्मणून मनूने भगवंतांस प्रश्न केला. त्यावर 'सरस्वती ही ब्रह्मदेवाची पलीच होय, तिला त्याने आपल्या आंगापासून उत्पन्न केली ह्मणून तिला लाक्षणिक कन्या असें मटले. वास्तविक अर्थ ती ब्रह्मदेवाची पली असाच होय. देवांची कर्मे मनुष्याप्रमाणे इंद्रियांनी घडत नसून ती मनुष्याच्या बुद्धिवाहेर आहेत. ती देवच जाणतात.' असें मत्स्यरूपी देवाने समाधान केले. पुराणांतील निंद्य गोष्टींचा उल्लेख करितांना ब्रह्मदेवाच्या कन्यागमनाविषयी प्रथम उल्लेख होतो. तेव्हां वरील समाधान पुराणभक्तांनी फार ध्यानात ठेवण्याजोगे आहे हे जाणून ह्या कथेचें मूळ अत्यंत संक्षेपतः पुढे दिले आहे:-मत्स्यरूपी भगवान् सांगतातः-'सावित्री लोकसटयर्थ हृदि कृत्वा समास्थितः । ततः संजपतस्तस्य भित्वा देहमकल्मषं ॥३-३० स्त्रीरूपमधमकरोदर्धं पुरुषरूपवत् । शतरूपा च सा ख्याता सावित्री च निगद्यते ॥ ३१ दृष्टा तां व्यथितस्तावत्कामबाणादितो विभुः । अहोरूपमहोरूपमिति चाह प्रजापतिः ॥ ३३ उपयेमे स धर्मात्मा शतरूपामनिंदिताम् । संवभूव तया सार्धमतिकामातुरो विभुः । सलज्जां चकमे देवः कमलोदरमंदिरे ॥ ४३ यावदब्दशतं दिव्यं यथान्यः प्राकृतो जनः । ततः कालेन महता तस्याः पुत्रो ऽभवन्मनुः ॥ ४४ मनु शका विचारितो:- 'अहो कष्टतरं चैतदंगजागमनं विभोः । कथं न दोषमगमत् कर्मणानेन पमः ॥ ४. १. भगवान् समाधान करितात:- दिव्येयमादिसृष्टिस्तु रजोगुणसमुद्भवा । अतींद्वि