________________
केकावलि. ४९, ५२-५४,८१-८२,८६-८८,१०३,१०७-११२ इत्यादि केकांत कवींनी भगवंतावर कोट्या लढविल्या आहेत, केका ८,१५,५५ त देवाला 'आळशी,' 'कां लाजसि' अशा रीतीने संबोधिलें आहे, केका ३१, ६८,१०३ त महादेवाला कमीपणा दिला आहे किंवा त्यांचा उपहास केला आहे, केका ८३-८४ त श्रीरामचंद्राला दोष दिला असून त्यांच्यावर कामुकत्वाचा आरोप केला आहे, व २,७,२४,१०१-१०२ इत्यादि केकांत भक्तिरसांत दुग्धांत लवणाप्रमाणे अति दु:सह होणाऱ्या शृंगाररसाचें अतिरिक्त वर्णन केले आहे. ह्या व इतर गोष्टींवरून मोरोपंताला पुष्कळ विद्वानांनी दूषण दिले आहे. या टीकाकारांपैकी काहींना निबंधमालाकतें कै० विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. वरील आक्षेपांसंबंधी विद्वन्मुकुटमणि रावबहादुर (हल्लींचे जस्टिस) रानडे यांनी आपला सविस्तर अभिप्राय दर्शविला आहे. त्यांतील पुढील उतारा वाचनीय समजून येथे दिला आहे:-रावबहादुर (हल्लींचे जस्टिस) रानडे यांचा अभिप्राय (निबंधमालेवरून):-"It ( Kekavali) is a hymn addressed to the Deity, and belongs to the devotional class of poetry. The devotional breathings are, however, of a sort which can be understood and relished in this country alone. There is no awe about the Deity, nothing of terror surrounding his glory, no humiliation of spirit on the devotee's part, no dazzling of sight at the awful vision. The relations between the worshipper and the worshipped are exceptionally free; every now and then there is a side-thrust and push at the Deity, which can be understood if not relished, in a country where both the prevailing philosophy and theology place man almost on an equality with God, and advocate either his present unity with or his future absorption in God. This kind of philosophy ( if wrongly applied'-S. V. P.) is destructive of all real devotion. As a work of art there is not another equal to it in the language. As a devotional hymn it does not strike harsh to the orthodox ear, but it is disqualified for any higher acceptance by the fault above pointed out.” (भाषांतर निबंधमालेवरून.) 'हे काव्य ईश्वराचें स्तोत्र आहे व याची गणना भक्तिपर ग्रंथांत होणारी आहे. या स्तोत्रांत जो ईश्वरविषयक भक्तीच्या उद्गारांचा प्रकार आढळतो तो एतद्देशवासी लोकांखेरीज इतर कोणास समजावयाचा नाही व रुचावयाचाही नाही. ईश्वराविषयीं भक्ताच्या मनांत ज्या वृत्ति स्वभावतः उत्पन्न व्हाव्या-म्हणजे त्याचे ऐश भयचकित होणे, आपली क्षुद्रता मनांत येऊन अत्यंत नम्र होणे, त्याच्या अगाध महिम्याकडे लक्ष जाऊन आश्चर्याने थक्क होऊन जाणे, आपल्या पापमग्नतेमुळे धाक वाटणे,-त्या या काव्यांत बिलकुल दृष्टीस पडत नाहीत. उलटा भज्य आणि भजक यांजमधील संबंध यांत अत्यंत निकटतेचा आढळतो. जागोजाग ईश्वराशीं अतिप्रसंग केलेला व त्याच्यावर कोटी लढविलेली, हा प्रकार प्रस्तुत काव्यांत आहे यास्तव या देशांतील तत्वज्ञानाचे व ईश्वरज्ञानाचे स्वरूप जे जाणत असतील,-म्हणजे मनुष्य व देव हे समसमान असून ते एकरूपच होत किंवा पुढे तरी त्यांचा अभेद होणारा आहे-हे ज्यांस माहित असेल त्यांसच प्रस्तुत काव्यांतील भाषणप्रकार अगोदर कळेल; मग तो आवडणें न आवडणे ही तर स्वतंत्र गोष्ट आहे ! वरील तत्वज्ञानाचा मार्ग भाल.