पान:केकावलि.djvu/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९८ मोरोपंतकृत म्हणोनि मज आपुल्या भजनिं लावणे लागली.' । म्हणाल, तरि तत्सुता केशि? तुम्हासवें भांडगा अहर्निशिंहि भांडला त्रिणव रात्र जो 'दांडगा. ॥ १. सेवेला. बाप सत्राजित जरि अपराधी होता तरी त्याची मुलगी सत्यभामा ही रूपयौवनसद्गुणसंपन्न असल्यामुळे तिचा मी अंगीकार केला. २. भाग पडले, स्वीकार करणे भाग पडले. ३. कदाचित् आपण म्हणाल परंतु तुझी कन्या तशी नाही. तूं अपराधी व तुझी कन्या ही साजरी व बहुतशी गुणी नाही, असें तूंच सांगतोस; मग तुझ्या कन्येचा स्वीकार कसा करावा ? असे आपण म्हणाल तर मी आपणाला दुसरे उदाहरण दाखवितों. ४. त्याची जांबवंताची कन्या. ५. त्या जांबवंताची कन्या जांबवती कशी स्वीकारली? जांबवंत दांडगा व भांडखोर होता आणि त्याची कन्या ही सुंदर गुणवती नव्हती, मग तिचा स्वीकार कसा केला? ६. तुमच्या बरोबर. ७. भांडखोर. जांबवानाने अमर्यादपणे तंटा करून तुमच्याशी २७ दिवस अहोरात्र मल्लयुद्ध केलें एवढा तो अपराधी, त्याची कन्या जांबवती हीही पण कुरूप, असे असूनही जर तुम्ही केवळ त्यावर कृपा करून त्याच्या मुलीशी लग्न लावले, तर मग त्याच्याहून कमी अपराधी जो मी त्या माझी जांबवतीइतकी वाईट नसणारी कन्या स्वीकारण्यास तुम्हांला काय हरकत असावी? जांबवान् अपराधी असतांही जशी त्याजवर कृपा केलीत तशी मजवरही करून माझ्या कवितारूपी कन्येचा स्वीकार करा. ८. अहर+निशा=दिवसरात्र रात्रंदिवस. ९. विनव-सत्तावीस. १०. उद्धट, आडदांड. व्युत्पत्तिः-'दंड धातूपासून निघालेल्या शब्दांकडे लक्ष दिले असतां मूळच्या अर्थाचा थोडा थोडा संबंध ठेऊन कशी अर्थातरे होतात तें ध्यानांत येईल. दंड म्हणजे शिक्षा ती करण्याचे साधन म्हणून काठीला दंड नांव पडले. त्यापासून दांडा शब्द निघाला. काठीचा उपयोग आडवी बांधून धोतर वगैरे वाळत घालण्यास करितात, त्यामुळे दांडी शब्द झाला. उदंड याचा अर्थ उंच आहे दांडा ज्याचा ते म्हणजे उंच छत्री वगैरे. यावरून उदंड म्हणजे पुष्कळ असा अर्थ झाला' (व्युत्पत्तिप्रदीप). दांड्यासारखा उंच यावरून दांडगा (उद्धट) शब्द निघाला. सोट शब्दाचा अर्थ तोच आहे. तिसऱ्या व चवथ्या चरणांत जांववानाचे प्रत्यक्ष नांव न । घेतां ज्या दांडगेश्वर व भांडखोर मनुष्याने सत्तावीस दिवस तुमच्याशी मल्लयुद्ध कर अशाच्या मुलीलाही तुम्ही वरिलें असें मोघम म्हटले आहे. पण या प्रसिद्ध गोष्टीवरून तो जांबवानच होय असा स्पष्ट बोध होतो म्हणून हा अवसर नामक अलंकार झाला. यावर पर्यायोक्ति । अलंकाराची उघड छाया पडली आहे. [मागें केका १ पृ० ४ टीप ३ पहा.] केका ३५-३९ । यांत प्रभूनें उत्तरोत्तर हीनगुण वस्तूचे सेवन केल्याबद्दल मोठे सरस वर्णन कवीने केलें आहे आणि त्यांच्या योग्यतेची तरी माझी कवितासुता खचित आहे, तेव्हा माझ्या तावधूचा स्वीकार करण्यास काही हरकत नाही असे प्रभूशी कोटिक्रम लढवून उपविले आहे. 'केकावलींतील दोषाविषयी विचारः-केका ३४-३९, ४८