पान:कुभ्रम निर्णय (Kubhram Nirnay).pdf/३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


प्रस्तावना. कै. रा. ब. केरो लक्ष्मण छत्रे यांचे नांव; यांची असामान्य विद्वत्ता; यांची शोधक बुद्धि; वगैरे गुण ऐकून ठाऊक नाही असा मनुष्य या महाराष्ट्रांत तरी खास आढळणार नाही. हे परलोकवासी होऊन आज बारा वर्षे झाली. ज्योतिष शास्त्रांत तर हे प्रवीण होते हे सर्वत्र सुप्रसिद्ध आहे. ज्योतिःशास्त्रासारख्या गहन विषयांतील एका वादग्रस्त मुद्यावर-भूमि स्थिर आहे किंवा गतिमान आहे'--यावर श्रीक्षेत्र काशी येथील एका नामांकित गणितवेत्त्याच्या "भूभ्रमनिर्णय" नामक पुस्तकांतील आक्षेपांचें या छोट्याश्या पुस्तकांत खंडन केले आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी मी काशीक्षेत्रांत असतांना त्याच्या हस्त- लेखाची एक नक्कल मला माझ्या एका स्नेह्याने छापण्यासाठी दिली होती. परंतु काही विशेष कारणांमुळे व मी उत्तर हिंदुस्थानांत अस- ल्यामुळे हे छापविण्याचे काम मागे पडलें, व कदाचित् हे पुस्तक बाहेर पडलेही नसते परंतु त्यास एक कारण झालें तें असें. मी, थोड्या दिवसांपूर्वी पुण्यास आलों तेव्हां तो लेख रा. रा. शंकर बाळ- कृष्ण दीक्षित, ट्रेनिंग कॉलेजांतील गणितशास्त्राचे अध्यापक, यांस दाखविला. पुस्तकावलोकन करून त्यांनी जो अभिप्राय दिला आहे तो पुस्तकाचे शेवटी जोडिला आहे. यालेरीन हा हस्तलेख मी रा. ण. नारायण बाळकृष्ण गोडबोले बी. ए. टेनिंग कॉलेजांतील व्हाइस भन्सिपाल, यांसही दाखविला. त्यांनाही मला अनुकूल मत दिले इतकें व हे परंतु मूळ विषयासंबंधे अनेक सूचना केल्या व पुस्तकांत दिलेली रकृति ही त्यांच्याच सूचनेवरून होय. या वरील दोन्ही बहुमान्य विद्वान् गृहस्थांची शिफारस हीच हे पुस्तक बाहेर पडण्यास कार- भत झाली. याबद्दल मी त्या सद्गृहस्थांचा फार आभारी आहे. येणे- माणे हस्तलेखाचा वृत्तांत व त्यावरील अभिप्राय वाचकांस कळवून है