पान:काश्मीर वर्णन.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८८ )

 आतां शेवटीं दोन शब्द सांगून हा भाग पुरा करितों. राजतरंगिणीरूप ऐतिहासिक ग्रंथांतील थोडीशी माहिती देण्याचा आह्मीवर यत्न केला आहे. पण आह्मांस संस्कृत भाषेचें ज्ञान नसल्यामुळे तो व्हावा तितका सफळ झालेला नाहीं व क्वचित् स्थलीं प्रमादही झाला असेल हें आह्मी समजून आहों. तर ह्या इतिहासाची साद्यंत व संगतवार माहिती, पंडित वामन शास्त्री इसलामपूरकर हे राजतरंगिणीचें मराठी भाषांतर करीत आहेत तें छापून प्रसिद्ध झाल्यावर वाचकांस प्राप्त होईल.