पान:काश्मीर वर्णन.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( १८७ )

गांवों मरण पावला. याच्या नंतर याचा पुत्र शहाज- हान यानें या भूस्वर्गी पांच सहा वेळ जाऊन सुखोपभोग घेतला. पुढें याचा पुत्र औरंगजेब हा जनानखान्यां- . तील स्त्रिया बरोबर घेऊन जात असतां या देशांतील विकट मार्गांत त्या अबलांवर जो जिवावरचा प्रसंग आला होता त्याची कथा आह्मीं पूर्वी दिल्लीच आहे. असो, पुढें इ० स० १७५२ त हा देश अहमदशहा अबदल्लीनें जिंकिला. तो इ० स० १८१८ पर्यंत दुराणी बादश- हांच्या ताब्यांत होता. याप्रमाणे सुमारें ५०० वर्षे हा देश यवनांचे अमलाखाली होता. चालू शत- काच्या आरंभी शीक लोक मोठे प्रबळ होत चालले. त्यांचा पुढारी रणजीतसिंग (पंजाबचा सिंह ) यानें इ० स० १८१९ मध्ये हा देश आपल्या हस्तगत करून घेतला. तो १८४५ पर्यंत त्याजकडे होता.त्याच्या मागून त्याचा पुत्र धुलीपसिंग हा राज्याचा खरा मालक पण तो बाल्यावस्थेत असतां आमच्या सार्वभौम सरका- रांनीं त्याजपासून कोणत्या न्यायाने राज्याचा बेदावा लिहून घेऊन त्यास नेमणूकदार बनविलें आणि त्याच्या बापाच्या पदरचा एक सामान्य सरदार गुलाबसिंग यास हें राज्य इ० स० १८४६ त दिलें या सर्व गोष्टी चालू शतकांत घडलेल्या असल्यामुळे वाचकांस माहितच आहेत. गुलाबसिंगानें इ० स० १८५७ सालचें बंड मोडण्याच्या कामी इंग्रज सरकारास कृतज्ञ - तापूर्वक मोठी मदत केली. सांप्रत त्याचे नातू प्रताप- सिंग हे राज्याचे मालक आहेत. त्यांजविषयीं थोडीशी माहिती पूर्वीच दिली आहे.