पान:काश्मीर वर्णन.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १४९ )

आला आणि त्याच्या सपाट्यांत त्यानें तोरमाणाचा वध केला. या वेळी त्याची अंजना नांवाची बायको गरो- दर होती. ही इक्ष्वाकु देशाचा राजा जो वजेंद्र याची कन्या होती. मरते वेळीं तोरमाणानें तिला कोठें तरी पळून जाऊन आपला बचाव करून घे ह्मणून सांगित- ल्यावरून ती एका कुंभाराच्या येथें छपून राहिली. तेथेंच प्रसुत होऊन तिला मुलगा झाला. त्याला कुंभारानें प्रवरसेन असें नांव ठेविलें. अंजनेनें त्या मुलाला आपल्या नांवानें लोकांत प्रसिद्धीस न आणतां कुंभार- णीच्या नांवानें प्रसिद्धीस आणला. अजाणते लोक जरी त्याला कुंभाराचें मूल असें ह्मणत होते, तरी त्याचे गुण तसे नसून तो कुलीन राजपुत्रासारखा दिसत होता व श्रेष्ठ लोकांच्या मुलांबरोबर खेळत असे. त्याचा मामा जयेंद्र याला त्याची सर्व हकीकत माहीत होती. तो प्रौढ झाल्यावर एके दिवशीं आपण कुंभारपुत्र नसून राजपुत्र आहों हें त्याला कळून आलें, तेव्हां तो फार दुःखित त्याचा चुलता हिरण्य हा फार क्रूर असून प्रकट झालें असतां आपल्याला मारील असे त्याला वाटले व कुंभाराच्या घरींही राहणें त्याला आवडलें नाहीं, ह्मणून तो तीर्थयात्रेला निघून गेला. झाला. इकडे सुमारें ३१ वर्षे राज्य करून हिरण्य स्वर्ग- वासी झाला. त्याला संतान नव्हतें, यामुळे या वेळीं काश्मीरचें राज्य विनवारसी झाले. याच समयास उज्जयनी नांवाचे नगरीत राजा विक्रमादित्य राज्य करीत होता. यास श्रीहर्ष असेंही ह्मणत. वेळी त्याचा ऐश्वर्यसूर्य अगदीं मध्याह्न काळावर त्या