Jump to content

पान:काशीयात्रा.pdf/८७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८४

एका दिवाणाने बांधली असे म्हणतात. ह्या देवालयांत जे मोठें देवालय आहे तें आदिकेशवाचे आहे. येथे शंख, चक्र, गदा, पद्म किरिटादि धारण केलेली श्री विष्णूची मूर्ति स्थापिली आहे. श्री विष्णूच्या मूर्तिजवळ एक सूर्य नारायणाची मूर्ति आहे. ह्या देवालयाच्या पूर्वेकडील द्वारी एक मंडप आहे. त्यास दहा खांब आहेत. ह्या मंडपांतून खाली गंगेवर जाण्यास पायऱ्या आहेत. त्यावरून पुष्कळ मूर्ति स्थापिलेल्या आहेत, त्यांपैकी संगमेश्वर आणि ब्रम्हेश्वर ह्यांचे विशेष महात्म आहे. आतां ह्यावरून वाचकांच्या लक्षांत सहज येईल की, ह्या ठिकाणी ब्रम्हा, विष्णु आणि शिव ह्या तिन्ही देवतांचें पूजन घडतें.
 बाकीच्या देवालयांतून लोकांस जाण्याचा प्रतिबंध आहे म्हणून वरुणासंगमाजवळ एक दगडी चौत्रा बांधला आहे. आणि त्यावर विष्णुपदाची आणि संगमेश्वराची स्थापना केली आहे. येथे एक मारुतीचे देवालय आहे.
 वरुणासंगमाजवळ जो घाट आहे त्याच्या माथ्यावर पूर्वीच्या किल्ल्याचे अवशेष नजरेस पडतात. ह्यावरून असे अनुमान होते की, ह्या किल्ल्यालगतच शहर वसलेले असावे, परंतु हल्लीं जें शहर आहे ते ह्या जाग्यापासून पुष्कळ लांब आहे.
 वरुणा घाटाच्या पश्चमेस एक मैदान सुमारे एक मैल लांब आणि १/ ४ मैल रुंद असे आहे. ह्या मैदानाच्या पूर्वोत्तर भागी गंगा आणि वरुणा ह्या नद्या आहेत. शिवाय पश्चमेच्या आंगास वरुणेस मिळणारा एक भला मोठा पाण्याने भरलेला ओढा आहे. अशा प्रकारें हें लहानसे मैदान तिन्ही अंगांनी स्वभावतः पाण्याने भरलेल्या खंदकानें वेष्टिलेले आहे. ह्याच मैदानांत प्राचीन काळीं हिंदूनी एक किल्ला बांधिला होता. तो अगदी मोडून गेला आहे. ता० ४ जून सन १८५७ इसवीत येथे बंड उद्भवले. तेव्हां इंग्रज सरकारची छावणी गंगा किनाऱ्यापासून तीन मैलांवर लांब