पान:काशीयात्रा.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करतो. तेथे श्राद्धादिक कृत्य करून तिसरे दिवशी प्रातःकाळी उठून तेथून पुढे सुमारें १४ मैलांवर रामेश्वर आहे तेथे मुक्का- मास येतो.तेथील यात्रा संपल्यावर चवथे दिवशीं शिवापुरास आठ मैल चालून येतो. येथे पांच पांडव आणि द्रौपदी ह्यांच्या मूर्ति आहेत. त्यांचे दर्शन वगैरे घेतल्यावर व दुसरी यात्रा संप- व्यावर पांचवे दिवशी सकाळी उठून सहा मैलांवर कपिलधारा म्हणून तीर्थ आहे तेथे येतो. आणि तेथे श्राद्धादि सर्व झाल्यावर सहावे दिवशीं वारणा संगमावरून पुनः मणिकर्णिकेपाशी येतो. कपिलवारपासून मणिकर्णिका ही ६ मैलच आहे. ह्याप्रमाणे एडि- टरराव, यात्रेकऱ्यांस ६ दिवसांत पन्नास मैलांची मजल करावी लागते. ह्या पन्नास मैलांपैकी वरुणेपासून आशीपावेतों ६ मेल गंगेच्या कांठाने चालावे लागते.
 कपिलधारेपासून मणिकर्णिका घाटापावेतो यात्रेकऱ्यास नव परेरावे लागतात. नंतर मणिकर्णिका घाटी स्नान वगैरे झाल्यावर तेथून साक्षीविनायकास जव टाकीत जातात. आणि तेथून पुनः मणिकर्णिका घाटाजवळ विनायक आहे तेथपर्यंत जव पेरीत पेरीत येतात. तेथून दर्शन घेऊन घरी जातात. पहिला जो खांड- व्याचा मुक्काम करितात म्हणून लिहिले आहे तेथे कर्दमेश्वर देव आहे. हे देवालय फार जुनाट असून ह्यावर कारागिरीही चांगली केल्याचे आढळते.
 ह्या पंचक्रोशी रस्त्याच्या दोन्ही आंगास वृक्ष लाविले आहेत. त्यांची गर्द छाया रस्त्यावर पडते. बहुत करून हे वृक्ष आंब्याचेच आहेत. ह्या पैकी कित्येक वृक्ष फार मोठे आहेत. ते असे कीं, त्यां चीं खोडें १२ पासून १७ फूट घेरांची आहेत. आतां दुसरी यात्रा पढल्या खेपेस लिहूं. लोभ करावा हे विनंती.

एडिटराचा मित्र एक फिरस्ता.