पान:काशीयात्रा.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्टेशन म्हणतात) उतरलो.ह्याचे भाडे तिसऱ्या क्लासाचें ४ रुपये ९ आणे ३ पे पडतें. तेथून हात्रोज गांव ६ मेल आहे व तेथून मथुरा २३ मैल आहे. इकडे सर्व रांगड्या लोकांची वस्ती व ते सर्व वृज भाषा बोलतात. हिंदूचे पेराव पुरुषाचे मुसलमान पुरुषाच्या पेरावासारखेच आहेत. फक्त बायकांच्या पेरावांत, हिंदूंच्या बायका घागरा नेसतात व काचोळी घालितात आणि आंगा- वरून चादर अगर छिटाची पासोडी पांघरतात आणि मुसलमान- नी पायजमा घालून आंगांत कफणी घालतात आणि वरून एक लुंगी पांघरतात. हा काय तो फरक आहे.

 बायकांच्या वेण्या बिलकूल घालीत नाहीत म्हटले तरी चालेल. ह्या मुलखांत आम्हास हात्रोजेपासून तो तहत मथुरे पर्यंत एकसा- रखी पांढरी माती लागली. देश अगदीं सपाट मैदान आहे. एकंदर २९ मैलाच्या प्रदेशांत फक्त दोन मोग्यांस मात्र पूल बांधलेले आढळले. बाकी रस्ता सपाट. देश फार सुपीक असून इकडे स्वस्ताईही बरीच आहे.हात्रोजेपासून मथुरेस जाण्यास बैल गाड्या, घोड्याचे शिग्राम वगैरे चांगले सोईवार मिळतात. मथुरेस जाण्यास ३ रुपये एका शिग्रामास भाडे पडते. मथुरेस यमुना नदी आहे तिला नावेचा पूल आहे.तो उतरून गांवांत जावे लागते. पुलावरून माणसास जाण्यास एक पैसा हशील पडतें.

 मथुरा क्षेत्र फार रमणीय आम्हास वाटले.हें विशेष करून दक्षिणोत्तर यमुनेच्या तटाकी वसले आहे.येथे इमारती फारच चांगल्या आहेत. त्याप्रमाणे दक्षिणेत कोठेही इमारती आढळत नाहींत. येथे सर्व इमारती दगडी असून कोरीव काम फार.येथे चार मजले उंच व महिरपदार कामे करण्याचा प्रचार फार. यमद्वितीयेच्या दिवशी विश्रांती घाटावर स्नान करण्याकरितां लाखो मनुष्यांचा मेळा जमतो.इकडे कृष्णभक्त लोक फार आहेत. सर्व गुजरायेंतील, मारवाडांतील, काठेवाडांतील वगैरे आसमंतांतील