किला. तो गौरीनें आपल्या शापरूप शब्द वज्राने चूर केला. नंतर दुसरा पहिल्यापेक्षा मोठा पर्वत टाकिला. त्यालाही गौरीने आपल्या वज्रानें चुरून टाकिलें, आणि आपल्या हातांतील शस्त्राचा प्रहार राक्षसावर करून त्याला धरणीवर असुरहित करून पाडिला. ह्याप्रमाणे दुर्गाचा वध झाल्यानंतर गौरीने त्याचे शीर छेदून घेतले आणि सर्व शत्रूचे निर्दळण केलें. अशा प्रकारे गौरीने विजय संपादिल्यावर सर्व देवांत अत्यानंद झाला. आणि ते सर्वजण तिचा स्तव करूं लागले. गंधर्व, अप्सरादि नृत्य गायन करूं लागली. आणि तिन्ही लोकांत एकच आनंद झाला. ही कथा जो कोणी श्रवण करील अथवा पठण करील त्यास कोणतेंही संकट प्राप्त होणार नाही, असा या कथेस गौरीने वर दिला, आणि त्या दिवसापासून दुर्गा हें नांव आपण धारण केले. ह्याप्रमाणे कृत्य करून दुर्गा कैलासास अंतर्धान पावली.
ह्या दुर्गेच्या देवालयाचा दरवाजा पश्चिमाभिमुख आहे. त्याच अंगानें थोरली सडक आशी वर गेली आहे. देवालयासमोर सडकेच्या आलीकडे एक नौबतखाना आहे. तेथे दररोज वेळच्या वेळीं चौघडा झडत असतो. देवीच्या देवळापुढे नौबतखान्यासमोर दोन लहान लहान देवळें असून त्यांच्यामध्ये दोन दगडी खांब आहेत. त्यापैकी दहा फुटी उंचीच्या खांबाची खुर्ची एक फूट तळाशी असून माथ्यावर एक दगडी सिंह आहे. दुसरा जो आहे तो २ फूट उंच आहे आणि ह्यावर देवीस जो बळी द्यावयास आणिलेला पशुभाग असतो तो मांडितात. ह्या खांबाजवळ एक लांकडी खांब आहे, त्याला जो पशू अर्पण करावयाचा असतो तो बांधितात.
देवद्वारांतून आंत गेल्यावर मंडपांत प्रथमतः दोन सिंह दगडाचे दृष्टीस पडतात. त्यांची तोंडें देवीच्या देवळाच्या आंतील द्वाराकडे परस्परांशी समोर आहेत. ह्या दोन्ही सिंहाच्या पलीकडे एक गणपतीचे आणि दुसरे महादेवाचे अशी दोन देवळे आहेत. महादेवाची शाळुंका संगमरवरी दगडाची असून पुढे
पान:काशीयात्रा.pdf/७९
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७६