पान:काशीयात्रा.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७५

ली. ही गोष्ट दुर्गास समजली तेव्हां त्यानें नयी फौज पाठावली, परंतु याचीही दशा पहिल्या सेनेच्या दशेप्रमाणे झाली. ही बातमी दुर्गास कळली तेव्हां त्यास अत्यंत क्रोध आला आणि त्याने लाखो फौज महाकालीवर पाठविली. तेव्हां महाकाली आकाश मार्गे पळून गौरी- कडे गेली. इकडे दुर्ग सेनाही तिच्या मागे तिचा पाठलाग करीत गेली. नंतर ते सर्व परत विध्याचल पर्वतावर येऊन राहिले. झालेले सर्व वृत्त महाकालीच्या मुखे गौरीने श्रवण केल्यावर तिनें स्वतः विलक्षण रूप धारण केले. ते असे की, स्वरूप अयंत लावण्य, परंतु अत्यंत, विशाल हात सहस्र पृथ्वीपासून आकाशा पावेतों पोहोचणारे. अशा प्रकारें गौरी युद्धास गेली. गौरीचे स्वरूप अत्यंत लावण्य पाहून दुर्गाने आपल्या सर्व सेनेस असा हुकूम केला की, गौरीस पाहिजे त्यांनी वरावी आणि आपली बायको करावी. असा हुकूम झाल्यावर मग काय विचारतां एडिटर बाबा, ज्याने त्याने आपला जीव ण करण्याचा निश्चय केला. नंतर ते सर्वजण अत्यंत आवेशाने गौ- रीवर चालून गेले. त्या वेळी सर्व अवनी थरथर कांपली. गौरीने इकडे आपल्या संरक्षणार्य लाखो देवसेना उत्पन्न केली. मग देव आणि दैत्य ह्यांचे तुंबळ युद्ध झाले. युद्ध संग्रामांत को- ट्यावधि राक्षस मारले गेले. असा विलक्षण कदरी प्रसंग गुदरला तेव्हां दुर्ग फारच तळमळला आणि मोठ्या क्रोधाने जातीने युद्धास आला. त्याने हातांत त्रिशूळ, खड़, ही आयुधे धारण केली होती. पाठीशी भाता बाणांनी भरलेला आणि धनुष्येही होती. इतक्या- सहीत दुर्गाने ग्राम भूमीवर येऊन गौरीस एक जबरदस्त प्रहार केला. तेव्हां तिला मूर्च्छना आली आणि ती बेशुद्ध पडली. कां- ही काळाने सावध झाल्यावर तिनें सर्व देवांस पुनः युद्ध संग्राम माजविण्यास आज्ञा केली.असा हा युद्ध प्रसंग चालला असतां दुर्गानें गोरीस गांठले आणि मग उभयतांच्या मध्ये अंतरिक्षी आणि पृथ्वीवर फारच तुंबळ युद्ध झाले.जेव्हां उभयतां पृथ्वीवर येऊ- न युद्ध करूं लागली तेव्हां दुर्गाने एक पर्वत गौरीचे आंगावर टा-