Jump to content

पान:काशीयात्रा.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७३

अशा प्रकारचें आहे, आणि जवळ कार्तिकस्वामी पुस्तक वाचीत आहेत.
 तिळभांडेश्वराच्या खालच्या अंगास एक मोठा अश्वत्याचा वृक्ष आहे. तेथे एक वीरश्रद्राची छिन्न भिन्न झालेली मूर्त आहे. ही मूर्त औरंग जेव पादशहानें फोडिली म्हणून सांगतात. येथून थोड्याच अंतरावर एक लिंबाचे झाड आहे, त्याच्या खाली अष्टभुजा देवीची मूर्त असून शिवाय नव दुर्गाच्या नऊ मूर्तेि आहेत.
 केदारनाथाच्या देवळाकडून दशाश्वमेधाकडे येऊं लागळे तर वाटेत दुलरेश्वराचे देऊळ आहे. हे देऊळ सातु बाबू या बंगाल्याने सुमारे पन्नास वर्षांपूर्वी बांधिलें.
ह्या मोहोल्यांत पुष्कळ ठिकाणी ज्या मूर्ति आहेत त्या पुष्कळ जुन्या काळच्या आहेत खऱ्या, परंतु तेणेंकरून ह्या मोहोल्यांत जुन्या काळी हल्लींप्रमाणे दाट वस्ती नव्हती म्हणून ह्या सर्व मूर्ति दुसऱ्या ठिकाणाहून आणिल्या आणि स्थापिल्या असे अनुमान करण्यास कांहीं बाध येतो असें नाहीं. लोभ असावा ही विनंती.

एडिटराचा मित्र एक

फिरस्ता.

दुर्गा देवी.

मु० श्री वाराणशी

ता० जानेवारी १८७२

.

ज्ञानप्रकाशकर्ते यांसः-
 वि० वि०. वाराणशीच्या दक्षिणेस दुर्गा देवीचे मोठे देवालय आहे.हे कोणी सातारच्या राजाची राणी भवानीबाई साहेब ह्यानों बांधिविले असे समजतें. ह्या देवीच्या नवळ एक दुर्गा- कुंड अथवा दुर्गातीर्थ नामें सरोवर आहे.मा तळ्याला चारी अंगानी घाट आहेत, आणि ह्यांत पाणी विपूळ आहे. ह्या