पान:काशीयात्रा.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२

आपण जे सांगाल तें मी करीन. तेव्हां वसिष्टानी त्यास निरंतर काशीस असावे म्हणून सांगितल्यावरून तो साक्षात शिवच येथे येऊन राहिला. अशी त्या केदारेश्वराची कथा आहे.
 येथे लक्ष्मीनारायण, भैरवनाथ, गणपति आणि अन्नपूर्णा ह्यांचीही देवळे आहेत. गंगेवर जाण्याच्या घाटाच्या अंगास जी केदारेश्वराच्या देवळाची भिंत आहे तिच्या बाहेरच्या अंगास हिंदी आणि बंगाली लीपीत केदारचरित्र कोरलेल्या अक्षरांनी लिहिले आहे. त्या देवळाच्या बाहेरील अवारांत भिकाऱ्यांची मनस्वी गर्दी असते. घाटावरून खालीं आलें म्हणजे तळाशी एक चौकोनी विहीर आहे, तिला गोरीकुंड असे नांव आहे. ह्या कुंडाच्या उदकाच्या सेवनाने ज्वराचा परिहार होतो असे सांगितले आहे.
 केदारेश्वराच्या देवळाच्या पश्चमेस सुमारे पाव मैलावर मानस- रोवर नामें कुंड आहे. या सभोवती सुमारे ५० लहान मोठी देवालये आहेत. येथे एक रामचंद्राचे देवालय मोठे आहे. हे मानसरोवराचे कुंड राजा मानसिंगानें बांधिलें.येथे एकंदर मूर्तीचा मोजून अंदाज केला तर हजारांपेक्षां कमी भरणार नाहीं. मानसरोवराच्या पूर्वद्वारों बाळकृष्णाचें मंदीर आहे. मूर्त रागांत असून हातांत लोण्याचा गोळा वगैरे आहे. जशी बायका आप ल्या तिकडे पितळेच्या बाळकृष्णाची पूजा करतात त्याप्रमाणे येथी- ल बाळकृष्णाची मूर्त आहे.
 येथेंच नेऋत्येस तिळभांडेश्वराचे देऊळ आहे. हे स्थान स्व- यंभू आहे असे म्हणतात. तरी पिंडीचा घेर सुमारे १५ फूट असून उंची ४|| फूट आहे. हा देव रोज एकेक तिळ वाढतो. तिळभांडे- श्वराच्या देवळाचा चौत्रा मनस्वी उंच केला आहे. येथें कार्तिक स्त्रामीचें देऊळ आहे. येथे एक शिवाची पाषाणाची मूर्ति फारच सुरेख केलेली आहे. तिचें ध्यान मोठ्या विचारांत निमम असावें