पान:काशीयात्रा.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६७

ह्या महजिदात गेलें तर तेथे पहिल्या हिंदूच्या देवळाचे खांब पुष्कळ नजरेस पडतात. ह्या महाजेदीस जी सफेती लावलेली आहे तो तर अगदीच घाणेरडी आहे. त्या सफेतीच्या योगानें ती खुलावी ते एकीकडे राहून उलटी ज्यास्त मळकट आणि कंटा- ळवाणी दिसते. ह्या महाजेदीस एक मोठा दरवाजा बांधलेला आहे, परंतु तो वागता दरवाजा नाहीं. तो हिंदु आणि मुसलमान ह्यांच्या तंट्यामुळे सरकार हुकुमानें बुजवून टाकिला आहे आणि दुसरी एक लहानशी वाट दुसऱ्या बाजूस कोपऱ्यास पाडलेली आहे. ह्या महाजेदीच्या थोरल्या दरवाज्याजवळ एक मोठा अश्वत्थ वृक्ष आहे. त्याचें दर्शन अंतर्गृहीच्या यात्रेच्या वेळी अवश्य आहे. या महाजेदीच्या खर्चास सरकारी तिजोरीतून भरलेल्या पैशाचें व्याज बरेंच येतें असे कळते. ह्या महाजेदीच्या आणि हल्लीच्या विश्वेश्वराच्या देवळाच्या मध्ये ज्ञानवापीचा मंडप आहे. ह्या ज्ञानवापत विश्वेश्वराची नित्य वस्ती आहे असे सांगतात. ह्याची कथा अशी आहे कीं, कोणे एका समयों वाराणशी क्षेत्री १२ वर्षे पर्यंत पाऊस पडला नाही आणि पाण्याचें अवर्षण पडले. तेव्हां एका ऋषीने शिवाच्या त्रिशुळाने ही विहीर खाणली आणि पाहतो तो तिला पाणी विपूल लागले.ही गोष्ट शंकरास कळतांच शंकर तेथे आले आणि त्यानी ऋषीस सांगितले की, आम्ही येथे निरंतर वास करूं. दुसरे असे सांगतात की, औरंग- जेबानें जेव्हां विश्वेश्वराचे पहिले देऊळ मोडलें तेव्हां पुजा-याने विश्वेश्वराचे लिंग उचलून ज्ञानवापत टाकिले.ह्या ज्ञानवापीस जो मंडप बांधिला आहे त्याचे काम चांगले केले आहे. छताचें काम कळसपाकी आहे. तीन दालनी मंडप आहे. ह्यास खांबांच्या चार ओळी आहेत. त्या सर्व मिळून खांब सुमारे ४० आहेत. हा मंडप बायजाबाई शिंदे ह्यानों सन १८१८ इसवीत बांधविला.
 ह्या मंडपासमीपच एक भला मोठा पाषाणाचा नंदी आहे. तो सु- मारे सात फूट उंच आहे. त्या नदीपासून थोड्याच अंतरावर ने-