शिक्षा मिळेल; कारण त्याने थोडे पैसे देऊन ज्यास्त लांब सदर कंपनीस फसवून जाण्याचा गुन्हा केला असे होईल. बरे कदाचित मेहेरबानी करून रेल्वेकडील लोकांनी त्यास गुन्ह्यांत न धरितां सोडिलें तरी जवळ ज्यास्त भाडे देण्यास पैसा नसल्यामुळेही आटकेंत बसण्याचा प्रसंग त्याजवर गुदरणारच. ह्याकरितां माझी त्यांस अशी विनंती आहे की, बाबाहो तुम्ही अशा चुका करूं नका आणि परमुलखांत गरीबाच्या गळ्यास रसायन लावू नका.
नंतर आम्ही सर्व मंडळी कल्याणास उतरलो. आणि मुंबईहून जी गाडी १० वाजतां जबलपुरास जाण्याकरितां निघते तीत सुमारे १२ वाजतां बसलो. नंतर ५ वाजण्याच्या सुमारास नाशिकास आलो, तो तेथें प्रयागाकडे जाण्याऱ्या लोकांची गर्दी बरीच होती. ती इतकी की, तेथे बिलकूल नवीन पासेंजर घालण्यास अवकाश नव्हता, तरी मेहेरबान गार्ड साहेबानी एकेक गाडीत बुटांच्या लातांचा प्रहार करून सुमारें नेटिव बकरी सत्तर सत्तर कोंडली आणि जेव्हां त्यांसच कंटाळा आला तेव्हां उरलेल्या प्यासेंजरास जावे म्हणून सांगितले. तेव्हां काय विचारतां, एडिटर साहेब बायकांच्या गाडीत एकच हलकल्होळ उठल; कारण गार्ड साहेबानी स्टेशनावर टिकिटे घेऊन आलेल्या एकंदर बायकांस पहिल्यानेंच कोंडिले होते, आणि मग जेव्हां पुरुष मंडळी पैकी काहींस गाडीत कोंडून बाकीच्यांस तुम जाव म्हणून आज्ञा केली तेव्हां त्यांत कोणाचे नवरे, कोणाचे भाऊ, कोणाचे बाप असे होते. अशा ज्या सर्व बायका होत्या त्यांनी गार्ड साहेबांस विनंती केली की, आम्ही पुढे जात नाही. आम्हास बाहेर काढा, तेव्हा त्यांस जबाब मिळाला की, नौ. आतां अशा कृतीने त्यांची काय अवस्था आणि दुर्दशा झाली असेल ह्याचा विचार वाचकानींच करावा.
नंतर आमची गाडी पुढें हाकली आणि सुमारें मध्यरात्रीच्या समयास भोसावळेस आली. तेथें तिसऱ्या क्लासाच्या प्यासेंजराच्या गाड्यांत जागा नव्हती, सबब ज्यानी तिसऱ्या क्लासाची टिकिटे
पान:काशीयात्रा.pdf/५
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२
