________________
[ ३ ] संबद्ध नाहींत. व मधील पुष्कळ भाग गळलेला आहे. परंतु ज्यांना सर्वच ग्रंथ वाचण्याची सवड अगर इच्छा नाहीं, त्यांना साधारण कल्पना येण्यास पुढील मजकुराचा उपयोग होईल. या ग्रंथांत शिवपूर्वकालीन लेख फारसे नाहींत. ले. ६ मध्ये शहाजीची कैफियत दिली आहे, तीत शिवपूर्वकालीन मजकूर बराचसा आहे व शहाजीच्या वेळच्या प्रसिद्ध व्यक्तींचा बराचसा निर्देश आहे. बाकीचे सर्व लेख शिवकालीन व उत्तरकालीन आहेत. ले. १४, १८. १९, २०, ३१ हे लेख कोल्हापुरकर संभाजी व शाहूराजे यांमधील तहाचे आहेत. त्यांनी उभयतांच्या मुलखाच्या हद्दी निश्चित केल्या आहेत. ले. २६ हा डच वखारीवाल्याशी संभाजी कोल्हापुरकर यानें केलेल्या तहाचा आहे. ले. २७ हैं भोपालजवळ, बाजीराव पेश- ब्यानें निजामुल्मुल्कास अडवून त्याचा मोड केला, त्यावेळचे खुद्द बाजीरावानें ब्रम्हेंद्रस्वामीस लिहिलेले पत्र आहे. ले. २९, ३०, ३१, ३२, ३३ हे चिमाजी आपानें वसई घेतल्याबद्दलचे आहेत. वसई घेणे किती दुरापास्त होतें व त्या विजयाचें महत्व मराठ्यांस किती वाटलें हें चिमाजी आपाच्या पत्रावरून दिसतें. या वेढ्याचें बरेंच तपशीलवार वर्णन ले. ३१ मध्ये आहे. "फिरंगी यांनी तो हिंमतीची व मर्दुमीची सीमा केली, ' ” “ फिरंगियांसारखे झुंजणार, टोपकर अग्निरूप होत. " या उद्गारांवरून उभयपक्षांच्या पराक्रमाची कल्पना येते. "6 बाजीराव व नानासाहेब यांच्या मागें पैशाची ओढ किती असे याची कल्पना येण्याजोगीं स्थळें पुष्कळ आहेत. पेशव्यांच्या मागें सर्व राज्याची काळजी; परंतु इतरांन त्याची कांहींच फिकीर नसे. प्रांतांचे सुभेदार, सरदार, कमाबीसदार वसूल वेळच्या वेळीं पाठवीत नसत व कित्येक तर अगदीच डोईजड असत. नागपूरकर भोसले यांनी पेशव्यांस कधींच मनापासून मदत केली नाहीं. उत्तर हिंदुस्थानांतील कमावीसदारहि निरनिराळ्या सबबी सांगून वेळ मारून नेत, (ले. १४८, १४९, १५८) त्यामुळे बाजीरावासारख्या पराक्रमी पुरुषासहि सावकारांची मनधरणी करावी लागे. ब्रम्हेंद्रस्वामी व कायगांवकर दीक्षित यांची कांहींशी गुरु म्हणून तर बऱ्याच अंशी सावकार म्हणून खुशामत करावी लागे, व तेहि या पारिस्थितीचा फायदा घेत असत. बाजीरावाचा मृत्यु होतांच दीक्षितांनी रकमेचा तगादा लावला व पुढें दुहोत्रा व्याज घेऊं म्हणून सांगितलें, त्यावर चिमाजी आपा व नानासाहेबांना 'दुहोत्राचा करार करावा असें काय आहे ?” असे लिहून कांहीं रकम दिली (ले. ३६-३७) तसेच सदाशिवरावानें ब्रम्हेंद्रस्वामीस " स्वामींनीं पैकियाविषयीं चार महिने कृपा करावी असें म्हणून स्वामीस थांबविलें (ले. ४२ ). " ले. ४९, ९२, १४४, १६६, १८६, १८९, १९५ वरूनहि पैशाच्या अडचणींची कल्पना येईल. ले. १२७ यांत तर राज्यास हा कर्जाचा क्षयरोग लागला आहे असे म्हटले आहे. बंगालचे मोहिमेवरून पैसा आणावा (ले. १६६ ), दिल्लीची वजीरी दुसन्यांस देऊन पैसा मिळवून कर्ज वारावें (ले. १६७), वगैरे मनसुबे केले पण कर्जाची ओढ मिटली नाहीं. शाहूच्या कारकीर्दीच्या अखेरीस राजस्त्रियांचे वर्चस्व कारभारांत होऊन शाहू कसा