Jump to content

पान:काव्येतिहास-संग्रह ३१ ऐतिहासिक पत्रे यादी वगैरे.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२] शाळा प्रेसचे मालक रा. रा. वासुदेवराव जोशी यांनी आमच्या विनंतीवरून हे काम पत रिलें. कै. साने यांचे चिरंजीवांनीहि पुनमुद्रणास परवानगी दिली. पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणें या कागदपत्रांचा कालानुक्रम साध- याचा प्रयत्न केला नव्हता, व त्यांची कारणेंहि तशींच अपरिहार्य होतीं. हल्ली कामाची मर्यादा बांधता आल्यामुळे सर्व कागदपत्रांच्या तारखा शोधून व जेथें नाहींत त्या आंतील मजकुराच्या संदर्भानें ठरवून अनुक्रम लाविला आहे. जेथें मूळांत तारीख मिती नाहीं अशा कांहीं पत्रांच्या हल्लीं दिलेल्या तारखा कदाचित् चुकल्या असण्याचा संभव आहे, परंतु शक्य तितकी काळजी घेतली आहे. काल कसा ठरविला हैं बहुतेक ठिकाणीं टीपेंत दर्शविलें आहे. त्यामुळे पडताळा पाहण्यास सोईचे होईल. पूर्वीचे आवृत्तीत मूळांतील अक्षरें न लागल्यामुळे जशी समजली तशीं अक्षरे देऊन संशय प्रगट केला आहे. अशा स्थळांपैकी पुष्कळ ठिकाणीं तर्कानें मूळांत शुद्ध अक्षरें कोणती असावीत तें संदर्भावरून व मोडी वाचनाच्या संभाव्य चुकांवरून ठरवून दुरुस्ती केली आहे. आणखीहि दुरुस्ती करतां येणें शक्य आहे. परंतु मूळ कागद हल्ली पहाण्यास मिळण्यासारखे नसल्यामुळे सर्वच दुरुस्त्या करितां आल्या नाहींत. कठीण शब्दांचा कोश शेवटीं निराळा दिल्यामुळे अर्थाच्या टीपा मजकुराच्या खाली आल्या नाहींत. फक्त महत्त्वाच्या व सदर्भदर्शक टीपाच काय त्या मजकुराखाली आल्या आहेत व टीपांची संख्या कमी झाली आहे. तेच तेच कठीण शब्द पुनः पुनः आल्यामुळे या नवीन पद्धतीने पुनरावृत्ति टाळतां आली आहे. दुसऱ्या कागदपत्रांशी अगर ग्रंथांशी संबंध दाखविणाऱ्या टीपा देण्याचा प्रथम विचार होता, परंतु असें करणें फारच त्रासाचें झालें असतें, त्यामुळे ग्रंथाच्या प्रकाशनास उशीर लागला असता. शिवाय हल्लीं सर्व साधनांचा उपयोग करून लिहिलेले इतिहासग्रंथ प्रसिद्ध झाले असून त्यांतच " पत्रे व यादी " या ग्रंथाचाहि उपयोग केलेला असल्यामुळे तो विषय काढतांच सर्व संबद्ध साधनांचा उल्लेख एके जागी मिळण्याची सोय झाली आहे. यामुळेहि वरील गोष्ट अनवश्यक वाटली. या ग्रंथांतील काही कागदपत्रे फार महत्वाची व कांहीं कमी महत्वाची आहेत. त्यांची निवड करून फक्त महत्वाचेच कागद पुनः छापावे असेंहि एकदां वाटलें, परंतु यांतहि एक अडचण अशी होती की, एकास ने पत्र निरुपयोगी वाटेल तेंच दुसन्यास उपयोगी असे वाटण्याचा संभव आहे. सबब सर्वच पत्रे छापून त्यांची चिकित्सा करण्याचें काम वाचकांवर सोपविलें आहे. या पुस्तकाच्या गुणदोषांविषयीं प्रकाशक जबाबदार नाहींत. तें काम पूर्णपणे संपाद- कांचें आहे. शक्य ती काळजी घेऊनहि या पुस्तकांत पुष्कळ दोष राहिले असतील. परंतु त्यांबद्दल वाचक आम्हांस क्षमा करतील अशी आशा आहे. " पत्र यादी 'तील ऐतिहासिक मजकुरासंबंधी कै. राजवाडे व खरे यांच्या खंडांच्या प्रस्तावनेप्रमाणें सारांशरूपाने दिग्दर्शन पुढे केले आहे. ग्रंथांतील सर्वच पत्रे एकमेकांशी