पान:काव्यदोष विवेचन.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

26 प्रस्तावना. सरकारी शाळांत चालणाऱ्या पुस्तकांतील अयोग्य व अज्ञानमलक अशा अर्थाच्या कवितांच्या दोषांबद्दल माझे विचार प्रसिद्ध करण्याचे बऱ्याच वर्षांपासून माझ्या मनांत होते; पण कामाच्या वगैरे अनेक अडचणींमुळे तें काम मागे पडले. तरी पण माझ्या मनांत त्याविषयी वारंवार वागत असे. आणि एजुकेशन कमिशन बसल्यापासून तर हे माझे विचार कधी प्रसिद्ध करीनसे झाले होते. इतक्यांत माझे परम जिवलग मित्र नीतीचे कैवारी मि० मोझेस येलायझा यांनी मला एकदां ह्या पुस्तकांत विवेचन केलेल्या कांहीं कवितां बद्दल आपले अभिप्राय मोठ्या कळवळ्याने दर्शविले. त्यावरून लागलेच मी गेल्या फेब्रुआरीच्या १८ व्या तारखेस ह्या विषयावर आर्यसमाजांत तोंडी व्याख्यान दिले. ते ऐकून आनरेबल राव बहादुर गोपाळराव हरी देशमुख, रा० रा० आत्माराम बापु दळवी वगरे विद्वान व सुधारणुकेच्छ अशा सद् गृहस्थांनी, ते आपणाला फार पसंत पडले आणि ते लिहून काढून छापून प्रसिद्ध करावे व त्याच्या प्रती एजुकेशन कमिशनकडे व विद्याखात्याच्या डायरेक्टर साहेबांकडे पाठवाव्या, झणजे त्याबद्दल जरूर विचार होईल, कारण तुह्मी सर्व खरूज उघडी केली आहे वगैरे प्रकारे आपले उद्गार काढिले. ह्यावरून मला मोठे उत्तेजन आले आणि नंतर मी तें व्याख्यान १५ दिवसांत लिहून काढले आणि आतां तें छा