पान:कार्यसंस्कृती.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एकत्र येणं मदर तेरेसा यांचं एक साधंच पण सुप्रसिद्ध वाक्य आहे. एका प्रवचनात त्या म्हणतात, 'हे पाहा, , मी जे करू शकते ते तुम्ही करू शकत नाही, आणि तुम्ही जे करता ते मला जमत नाही. मात्र तसं असलं, तरी आपण एकत्र येऊन काम केलं तर आपण अनेक अद्वितीय गोष्टी करू शकू.' एकत्र येणं आपल्याला जमता जमत नाही. आपण जभाव म्हणून एकत्र येऊ शकतो; पण एकत्र येऊन आपल्याला काम करताच येत नाही. कोण मोठा, कोण छोटा, आपला कोण, परका कोण, एकत्र येण्यानं कोण फायदा जास्त उपटणार अन कोण कुणाला गंडवणार असे विचार आपल्या मनात असतात. मांझ्यात जे कमी आहे ते ती भरू शकेल काय किंवा मी त्याला काय अन कशी मदत करू शकेन असा शुद्ध विचार करण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे. एकत्र काम करायला, एकत्र विचार करायला अन एकत्र राहून यशाचं शिखर गाठायला शिकायला पाहिजे. असं एक शिखर गाठून मग तशी अनेक शिखरं गाठण्याची इच्छा मनात बाळगायला पाहिजे. एकत्र येणं शिखर गाठण्यासाठी, मनापासून स्वतःला बाजूला ठेवून दुसऱ्याला समजून घेऊन काम करण्यासाठी. ७ कार्यसंस्कृती