हे पान प्रमाणित केलेले आहे.
होतो. कार्यक्षमता वाढते, त्या कारखान्याला किंवा संस्थेला अधिक कामं मिळू लागतात. त्यांचा एकूण क्षेत्रावर किंवा मार्केटवर अधिक प्रभाव पडतो. अधिक लोक रुजू होतात, औद्योगिक कक्षा वाढत वाढत जातात.
हे भाषण फारच गाजलं. त्यानं संपूर्ण जपानी औद्योगिक क्षेत्राला चालना दिली आणि १९५१ मध्ये म्हणजे हे भाषण होऊन २ वर्ष होतात तोच डेमिंग जपानमध्ये अक्षरशः हीरो ठरला. जपानमधल्या
गुणवत्तेच्या चळवळीचा हीरो डब्ल्यू एडवर्डस् डेमिंग.
गुणवत्तेचा आग्रह आणि त्याची सातत्यानं केलेली आराधना कुणाला कसं नेते आणि व्यापक पातळीवर काय क्रांती करते याचं उत्तम उदाहरण म्हणजे डेमिंगची गुणवत्ता.
१५। कार्यशैली