पान:कार्यशैली.pdf/१२३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९१.दोन नेते


 कुठल्याही सामूहिक कामाला नेता लागतोच.एखाद्या फुटबॉल संघाला लागतो,देशाला लागतो, एखाद्या छोट्या ऑफिसला लागतो किंवा मार्केटिंग सर्वे करणाऱ्या एखाद्या टीमलाही नेता लागतो.नेता बरं का.नुसता व्यवस्थापक नव्हे.नेता म्हणजे नेणारा,टीमला त्यांच्या ईप्सित ठिकाणी नेणारा नेता.
 अशा नेत्यांचे दोन मुख्य प्रकार आहेत.एक आहे कार्यलक्ष्मी तर दुसरा आहे कार्यकर्तालक्ष्मी. पहिल्याचं सारं लक्ष कार्यावर, तर दुसऱ्या प्रकारच्या नेत्याचं सारं लक्ष कार्यकर्त्यांवर.दोन्ही प्रकारचे नेते थोर.फार मोठी कर्तबगारी गाजवणारे, पण एकमेकांत फरक असणारे.दोघांचीही शैली वेगळी,पद्धत वेगळी, परिणामही सर्वस्वी वेगळा.

 कार्यलक्ष्मी नेत्याची काही लक्षणं आहेत.जो किंवा जी वेगवेगळ्या कल्पना पेरून कामार गन आणण्याचा प्रयत्न करते,हळू आणि रडतखडत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना उत्तेजन देऊन कार्यप्रण करते,ठरलेल्या वेळेसच काम पूर्ण करण्याचा जोरदार आग्रह करते आणि सर्व सहकान्यांना ठराविक मुदतीनं भेटतेच भेटते, बोलत राहात.अशा प्रकारच्या नेत्याचा एक मोठा प्रयत्न असतो की गटामधले सारे जण त्यांच्या त्यांच्या परिसीमा गाठत राहतील.

कार्यशैली। १२२