पान:कार्यशैली.pdf/१२२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९०. छोट्यांची मोठी ताकद



 छोट्या, बारीकसारीक गोष्टी किती गांभीर्यानं घ्यायच्या हा खरंच प्रश्न आहे. उदाहरणार्थ गाडीच्या इंजिनमधून विचित्र आवाज येतो आहे. हल्ली दर थोड्या दिवसांनी मान धरते आहे. थोडं वाचल्यानंतर कपाळाच्या मधोमध दुखतं आहे. बऱ्याच दिवसांपासून हिशेब पूर्ण करायचे राहिले आहेत.
 छोट्या गोष्टी आहेत पण गांभीर्यानं घेतल्या नाही तर मोठं संकट उभं करू शकते. गाडीच्या इंजिनमधला आवाज अपघातही घडवू शकतो. दर चार दिवसांनी निर्माण होणारा मानेचा प्रॉब्लेम मणक्याकडे लक्ष वेधणारा असू शकतो.
 गोष्टी छोट्याच असतात पण त्यांच्यामध्ये थोडं, भयानक आणि रौद्र स्वरूप करण्याचं सामर्थ्य असतं. जीवनाच्या गतीला ब्रेक लावण्याचं, अडथळे निर्माण करण्याचं काम या छोट्या गोष्टी नक्की करू शकतात. अशा छोट्या गोष्टींना नजरेआड करू नये अर्थात त्यांना फार कवटाळूही नये पण

दुर्लक्ष करणं महाघातक ठरू शकतं. एवढं ध्यानात राहू दे.

१२१। कार्यशैली