पान:कार्यशैली.pdf/१२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६. मानसिक दराऱ्याचं वर्तुळ


 मला महाराष्ट्रातील एका मोठ्या राजकीय नेत्यांची गोष्ट माहीत आहे. एका निवडणुकीत त्यांना त्यांच्या अगदी जवळच्या सहकान्यांनी आणि अनुयायांनी चुकीची माहिती दिल्याने त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा एका महत्त्वाच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला.
 मला दोन प्रश्न पडले. या जवळच्या सहकान्यांनी आपल्या परमप्रिय नेत्याला चुकीची माहिती देऊन आपल्याच पायावर धोंडा का पाडून घेतला? आणि दुसरा प्रश्न या नेत्याकडे ती माहिती कितपत खरी आहे, हे तपासण्याची काहीच व्यवस्था नव्हती का?

 या दोन्ही उत्तरांचा शोध घेता घेता एक गोष्ट लक्षात आली की हा नेता आणि या नेत्याचं जवळचं वर्तुळ यात प्रत्यक्ष असं खूपच मोठं अंतर आहे. हा नेता खूप बड़ा आहे. त्याचा एक दरारा आहे. त्याच्याविषयी जनमानसात आणि अनुयायांत प्रचंड मोठा दरारा आहे. त्याचा एक मानसिक दरारा आहे. आणि दडपण आहे असं म्हणता येईल. या दरान्यामुळे या नेत्याचा कुणाशी संपर्कच नाही अशी अवस्था आहे. एकटा, एकाकी आणि स्वत:च्याच मानसिक दरायाच्या तुरुंगात तो खितपत पडला आहे असंच मला वाटतं.

११। कार्यशैली