या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मोठ्या अधिकारपदावर असलेल्या सर्वांचंच हे असं असतं. त्यांच्या आसपासची माणसं अधिकारानं आणि एकूण प्रभावानं इतकी छोटी असतात की प्रमुख माणसाचा आपल्या जवळच्या सहकान्यांशी काही संवादच नसतो. आणि ही गोष्ट त्या नेत्याच्याच तेजोभंगाला कारणीभूत ठरते. स्वतःचाच प्रभाव स्वतःच्या पतनाला कारणीभूत असा तो प्रकार आहे.
अर्थात यावर उपाय आहे. अशा उच्च पदावर असलेल्या माणसानं दोन्ही बाजूंनी अधिकाधिक संपर्क कसा होईल यावर प्रयत्न करून सुधारणा करायला पाहिजे आणि आपल्या सहकाऱ्यांचंही मानसिक दरायचं वर्तुळ वाढत जाईल हे पाहायला पाहिजे. ते केलं नाही तर मात्र पतनच दुसरं- तिसरं काही नाही.
कार्यशैली । १२