पान:कविता गजाआडच्या.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्हाईट हाऊसमधल्या
दालनातला तो
रक्तवर्णी फोनचा
विषगर्भ
आंबट आकडा.
मग,
अंधाराच्या आदीम कल्लोळात ...
बुडून जाऊदेत सारेच आदिबंध.
...
पुन्हा एकदा
सुस्नात पहाटेसारखी
'ईव्ह' होऊन येईन मी
पण,
ज्ञानवृक्षाचे फळ
चाखण्या आधी
चिमणीच्या दातांनी
भरवीन
पहिला घास
तुला.
हो...तुला !!!
मग कदाचित्
उसंत मिळेल
वर्तमानपत्रातल्या अक्षरांना
माणसांच्या बातम्या छापण्याची
...
तो पर्यंत...!!!

कविता गजाआडच्या / ७२